संवादाने नात्याचा सेतू बांधा.. 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2019 08:10 PM2019-11-30T20:10:28+5:302019-11-30T20:12:01+5:30

जीवन आनंदी जगण्यासाठी जीवनाच्या सर्व अंगाना महत्त्व द्या व कुठलाही अतिरेक न करता , मध्यम मार्गाचा अवलंब करा...

Build bridges with communication .. | संवादाने नात्याचा सेतू बांधा.. 

संवादाने नात्याचा सेतू बांधा.. 

Next

डॉ. दत्ता कोहिनकर- 
आमच्याच सोसायटीत राहणारा अमित माझा सहकारी मित्र , त्याच्या तरूण मुलाबद्दल चिंतित होता . त्याच्या मुलाला अध्यात्माची खूपच आवड लागली होती . तो घरात मिसळत नव्हता . कुठल्याही समारंभाला येत नव्हता. खाण्याची खूपच पथ्ये पाळत होता . त्याला रात्री नीट झोप येत नव्हती . स्त्रीयांशी बोलताना तो मान खाली घालायचा किंवा स्त्रीयांना टाळायचा . एकटाच शुन्यात बसून रहायचा . त्याच्या चेहऱ्यावर भयंकर ताण व औदासिन्य दिसत होते . लग्नाचा विषय काढला कि तो नाराज व्हायचा . लग्न करायच नाही म्हणायचा .सन्यास घेण्याची
भाषा करायचा . सारखाच आश्रमात जायचा .
 घरात लाडाने त्याला ढेबू म्हणायचे . एके दिवशी मी ढेबूला माझ्याकडे अर्जितसिंग च्या कार्यक्रमाचे पास आहेत , तू पण चल असे म्हटले . त्याक्षणी ढेबू मला म्हणाला , मी येणार नाही . कारण गुरुजीनी सांगितलेय , नाच गाण्यापासून दूर रहा . नाच व गाण्यांमुळे मन प्रक्षुब्ध होऊन वासना बळावतात व त्यातून शील भंग होऊ शकतो . त्यामुळे मी येऊ शकत नाही असे उत्तर त्याने दिले . यासारख्या समजुतींनी ढेबूने त्याच्या आयुष्यातील मनोरंजनाचा दरवाजा बंद केला होता . त्याक्षणी मला एक गोष्ट आठवली . एका राजाने स्वसंरक्षणासाठी असा राजवाडा बांधला कि साधा किटक पण आत येऊ शकणार नाही . त्याने राजवाड्याला फक्त एकच दरवाजा ठेवून तिथे सशस्त्र पहारेकरी ठेवले . शेजारील राजाने हा राजवाडा पाहून - तसाच राजवाडा स्वत : साठी बांधण्याचे ठरवले . राजवाड्यातून निघताना या दोन्ही राजांच्या गप्पा ऐकून एक फकीर जोरजोरात हसू लागला . फकिराला हसण्याचे कारण विचारले असता फकीर म्हणाला , राजा या एका उघड्या दरवाजातून पण कोणीही येऊ शकेल , तोही बंद कर ना . हे ऐकताच राजा म्हणाला , हा दरवाजा पण बंद केला तर मी आतच मरून जाईन ना . मग हे थडगच होईन . मित्रांनो, ढेबू सारखी अनेक तरूण मुलं नको त्या गुरुजींच्या नादी लागून , मुक्तीऐवजी - बंधनात अडकत आहेत . निसर्गाच्या विरोधात जात आहेत . 
निसर्गाच्या नियमांविरुद्ध गेल्याने शारीरिक व मानसिक धक्के खात आहेत .डिप्रेशन युक्त व अंबनॉर्मल जीवन जगत आहेत .आनंदी जीवन जगण्याचे अनेक दरवाजे बंद करून भावभावनांचे दमन केल्यामुळे नैराश्यात जात आहेत . जीवन आनंदी जगण्यासाठी जीवनाच्या सर्व अंगाना महत्त्व द्या व कुठलाही अतिरेक न करता , मध्यम मार्गाचा अवलंब करा . स्वत : च स्वत : ला तपासून पहा व आनंदी रहा . 
 

Web Title: Build bridges with communication ..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.