शहरं
Join us  
Trending Stories
1
सामंतांनी मदत केली तर... रत्नागिरी-सिंधुदूर्गात राणे - ठाकरे संघर्षाचा सामना; बालेकिल्ला कोणाचा याचाही फैसला
2
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
3
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
4
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
5
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
6
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
7
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
8
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
9
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
10
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
11
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
12
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
13
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
14
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
15
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
16
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
17
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
18
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
19
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
20
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका

अस्मिता-अभिमान-परंपरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2018 5:26 AM

वैयक्तिक मानवी जीवन हे व्यापक लोकजीवनाला जोडणारी, ‘अस्मिता’ ही एक शक्ती आहे. अस्मिता म्हणजे अभिमान नव्हे तर एका अर्थाने अस्तित्वाची जाणीव होय. ही अस्मिता कृतीतून, वृत्तीतून, शब्दातून, वागण्यातून व्यक्त होत असते.

- डॉ. रामचंद्र देखणेवैयक्तिक मानवी जीवन हे व्यापक लोकजीवनाला जोडणारी, ‘अस्मिता’ ही एक शक्ती आहे. अस्मिता म्हणजे अभिमान नव्हे तर एका अर्थाने अस्तित्वाची जाणीव होय. ही अस्मिता कृतीतून, वृत्तीतून, शब्दातून, वागण्यातून व्यक्त होत असते. माणूस हा काही मूल्ये, काही संस्कार, काही परंपरा आणि काही आदर्श घेऊनच जगत असतो. हे आदर्श, ही परंपरा, हे संस्कार त्याला एकीकडे जगण्याला आनंद देतात तर दुसरीकडे जगण्याची दिशा. त्याच्यावर घडणाऱ्या संस्काराप्रमाणे किंवा विचारप्रणालीप्रमाणे तो वागत असतो. आणि त्या परंपरेचा अभिमान बाळगत असतो. एकीकडे अभिमान हा महान सतकृती ठरतो तर दुसरीकडे वृथा अहंकार व त्याचा अभिमान ही विकृतीही. देश, संस्कृती, भाषा, भूमी, आई-वडील, घराणे, गाव या विषयीचा अभिमान हा एका संस्कृतीलाच उभा करतो. माझ्या घरी पंढरीची वारी आहे. माझ्या आजोबांपासून आमच्या घरात प्रत्येक पिढीत एक एक शिक्षक आहेत.सातारा जिल्ह्यात एक गाव असे आहे की, त्या गावातील प्रत्येक घरातील एक माणूस सैन्यदलात भरती होऊन देशसेवेसाठी सज्ज झाला आहे. गावकºयांना गावच्या या परंपरेचा अभिमान आहे. म्हणून अभिमानाची परंपरा बाळगण्यापेक्षा परंपरेचा अभिमान बाळगावा. ज्ञानदेवही काही वेळा अभिमानाचा अविष्कार घडवतात.तयाचिये देशींच्या झाडी। कल्पतरुते होडी।न जिणावे का एवढी।मायबापे असता।। (ज्ञानेश्वरी १८/१६४२)ते पाषाणही आघवे। चिंतारत्ने का नोहावे।तिये भूमिके का न यावे।चैतन्याच।। १८-१६४३ज्ञानदेव म्हणतात, ज्या देशात ऐश्वर्यशक्तीचा महामेरू भगवान कृष्ण आहे आणि समृद्धीचा आगर असणारी साक्षात लक्ष्मी ही वास करते आहे. तिथल्या माणसांनी करंटे का राहावे? त्या देशातील झाडांनी कल्पतरुची बरोबरी का करू नये? तिथल्या सर्व दगडांनी चिंतामणी का होऊ नये? आणि तिथल्या भूमिलाही चैतन्यत्व का प्राप्त होऊ नये? तिथल्या नद्या अमृत घेऊन का वाहू नयेत? आणि तिथल्या माणसांना ‘सच्चिदानंद पद’ का लाभू नये? मानवी जीवनाला वैराग्य, अनासक्ती, शमदम यासारख्या निवृत्तीवादात अडकविणारे ज्ञानदेवांचे विचार नाहीत तर आदर्शाची अस्मिता जागवून पुरुषार्थप्रधान आनंद देणारे शुभ प्रवृत्तीवादी विचार आहेत. निवृत्तीवादी तत्त्वांचे रक्षण होण्यासाठी शुद्ध प्रवृत्तीवाद जपायला हवा.

टॅग्स :spiritualअध्यात्मिक