शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
2
"आम्ही गांधींचा भारत स्वीकारला होता, मोदींचा भारत नाही", फारुख अब्दुल्लांचा भाजपावर हल्लाबोल
3
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
4
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
5
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
6
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून
7
मनात धाकधूक की राजकीय खेळी? सुप्रियाताई अचानक अजितदादांच्या घरी का गेल्या?; बारामतीत तर्कवितर्क
8
अरविंद केजरीवाल यांना दुहेरी धक्का; सुप्रीम कोर्टाचा दिलासा नाही, कोठडी २० मेपर्यंत वाढवली
9
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
10
किरण सामंत नॉट रिचेबल, ठाकरे गटाने केली पोलीस संरक्षण देण्याची मागणी, उदय सामंतांनी दिलं असं स्पष्टीकरण
11
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी पुन्हा घरसला, ३ दिवसांत गुंतवणूकदारांचे ११ लाख कोटी बुडाले
12
'हीरामंडी'मधील शेखर सुमनसोबतच्या इंटीमेट सीनवर मनीषा कोईरालानं सोडलं मौन, म्हणाली...
13
गुजरातमधील नवसारी मतदारसंघात मराठीचाच 'आवाssज', मताधिक्य पाहून व्हाल अवाक्
14
दृष्टीहीन तरुणीने पंतप्रधानांचा हात पकडला; SPG कमांडो आला तेवढ्यात...पाहा मोदींनी काय केले
15
Baramati Lok Sabha : 'मटण, दारु, मताला हजार रुपये वाटले...' सुनिल शेळकेंचे आमदार रोहित पवारांवर गंभीर आरोप
16
₹१४४ वर आलेला IPO; आता शेअरनं पकडल रॉकेट स्पीड, ४ दिवसांपासून लागतंय अपर सर्किट
17
उत्तर प्रदेशमध्ये इंडिया आघाडीसाठी राहुल गांधींनी घेतला मोठा निर्णय; भाजपाच्या अडचणी वाढणार?
18
MS Dhoni च्या फलंदाजी क्रमावरून टीका करणाऱ्यांनो, जरा कारण जाणून घ्या! औषधं खाऊन खेळतोय तो
19
भाजपात सामील झाल्यानंतर शेखर सुमन म्हणाले, "मी सामान्य माणूस, हिरामंडीचा नवाब नाही..."
20
"मी नाही तर कोण?" अमिताभ बच्चन यांच्याशी तुलना केल्यानंतर ट्रोल झालेली कंगना पुन्हा बरळली

आनंद तरंग: कर्माचे बीजारोपण

By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2020 6:28 AM

आपले सुसंस्कारी जीवन नवीन संस्कृतीला जन्म देऊ शकेल. देशाचे उज्ज्वल भविष्य आपल्या सर्वांच्या हातात आहे.

नीता ब्रह्मकुमारीशिक्षणासाठी आणि रोजगारासाठी विदेशात गेलेला भारतीय युवावर्ग तेथील स्वच्छंद जीवन पद्धतीच्या आहारी जात आहे. पैशाच्या मोबदल्यात भारतीय संस्कृती पणाला लावत आहे. स्वत:चे संस्कारी जीवनसुद्धा गहाण ठेवत आहे. एके काळची म्हण होती की, ‘धन गेले तर काही गेले नाही, तन गेले तर थोडे काही गेले, पण चरित्र गेले तर सर्व काही गेले.’ आज हीच म्हण उलटी झाली आहे. चरित्र गेले तर काही हरकत नाही, तन गेले तर थोडेसे नुकसान झाले, पण धन गेले तर सर्वस्व गेले. आज कोणी कितीही धनाढ्य असला तरी त्यांच्याकडे गुणांची, चांगल्या संस्कारांची गरिबी दिसून येते. भारत संतांची, महात्म्यांची अनेक योगींची जन्मभूमी आहे. त्यांच्या पवित्र जीवनाचा सन्मान करून आपण ही प्राचीन संस्कृती जपण्याचा पूर्ण प्रयत्न करू या. यासाठी आपण स्वत: सुसंस्कारी बनण्यास प्रयत्नशील राहू या. कारण आज प्रत्येक मनुष्यात कोणत्या ना कोणत्या वाईट सवयी आहेत. कदाचित याच सवयी ज्यांना संस्कार म्हटले जाते, यामुळेच आपण दु:खी आहोत. सूक्ष्म आणि स्थूल सवयींना बदलण्यासाठी प्रत्येक कर्मावर लक्ष ठेवायला हवे. कारण या कर्मांची शृंखला संस्कारांना जन्म देते आणि हेच शक्तिशाली संस्कार आपल्याकडून वारंवार तेच कर्म करून घेतात. कर्म आणि संस्कार यात एक सूक्ष्म धागा आहे. जर त्याला जाणीवपूर्वक, युक्तीने तोडण्याचे सामर्थ्य आपल्यात आले तर पूर्ण जीवनच बदलून जाईल. आपण आपल्या जीवनाचे शिल्पकार आहोत. पण मनुष्य जीवन त्याच्या कुटुंबाला, समाजाला तसेच देशाला घडवते. आपले सुसंस्कारी जीवन नवीन संस्कृतीला जन्म देऊ शकेल. देशाचे उज्ज्वल भविष्य आपल्या सर्वांच्या हातात आहे. चला तर मग, आपल्या श्रेष्ठ कर्मांचे बीजारोपण करून सुंदर संस्कारांनी नवीन संस्कृतीची बाग फुलवू या. या बागेत येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला गुणांचा सुवास, उत्साहाचा झोपाळा, प्रेमाची सावली लाभेल जेणेकरून त्याचे जीवनही सुगंधी बनेल.

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक