शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

अध्यात्म - तरुणांनो

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2018 00:30 IST

शिकागोच्या धर्मपरिषदेत विवेकानंदांनी पहिले भाषण केले हिंदू धर्माचे प्रतिनिधी म्हणून. ते भाषण गाजले त्यातील पहिल्या दोन शब्दांनी. माय ब्रदर्स अ‍ॅण्ड सिस्टर्स आॅफ अमेरिका हे ते शब्द. बस आपण इथेच थांबलो.

- किशोर पाठकशिकागोच्या धर्मपरिषदेत विवेकानंदांनी पहिले भाषण केले हिंदू धर्माचे प्रतिनिधी म्हणून. ते भाषण गाजले त्यातील पहिल्या दोन शब्दांनी. माय ब्रदर्स अ‍ॅण्ड सिस्टर्स आॅफ अमेरिका हे ते शब्द. बस आपण इथेच थांबलो. एखाद्या व्यक्तीचं गुणगान करताना त्याला क्षणात संपवण्याचा हा खेळ आहे. सगळ्या लोकोत्तर पुरुषांचं हेच केलं आपण. सावरकर - समुद्रात टाकली उडी, बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान, महात्मा गांधींचे सत्याचे प्रयोग. सांगायचं एवढंच की महामानव आपण एखाद्या घटनेत संपवले. शिवाजी महाराज आपण एका घोषणेत बसवले. जय भवानी जय शिवाजी. आजच्या काळात फुले-शाहू-आंबेडकर आपण एका वाक्यात बसवले. ते आपल्या सोयीचे केले. तरुणांसाठी. त्यांना शॉर्टकट हवाय. खूप वाचाय-लिहायला वेळ नाही. एखाद्या व्यक्तीचं सर्व बाजूंनी आकलन करायचं नाही. कोणताही प्रश्न सर्व बाजूंनी समजून घ्यायचा नाही. म्हणून मग सोपं उत्तर घोषणा, एकत्र येणं. संघटन म्हणून नाही जमाव म्हणून एकत्र येणं. मग त्या जमावाला चेहरा नसतो. असते एक आॅर्डर कुण्या नेत्याने केलेली. तरुण पुकारतो पुढे जातो मग तोडफोड करा. गाड्या जाळा, दंगल करा, तो बेभान होतो. झालं. राजकीय संपत्तीचं नुकसान करून तो मोकळा होतो. मोकळा कसला बांधला जातो. कुठे तरी कॅमेऱ्यात तो बंदिस्त होतो. मग ससेमिरा, धरपकड तो पकडला जातो. त्याच्याकडून इतरांची नावे वदवली जातात. तो पुरता अडकतो. दप्तरी त्याची गुन्हेगार म्हणून नोंद होते. केस चालत राहते. तशी तारुण्याची नशा संपत जाते. आपण हे काय करून बसलो. आता आपल्याजवळ कोण आहे? कोण आहे पाठीराखा? कोण तारणहार? भडकवणारा नेता जागेवर नाही. तो एकतर मोठा झालेला. व्यस्त असलेला. तरुण भग्ण भिरभिरतोय. नोंद झाल्याने सरकारी वा चांगल्या पगाराची नोकरी नाही. जॉब नाही. म्हणून लग्न नाही. मुलीला काम करणारा मुलगा लागतो. तरुण एखादी पोरगी मनात भरते. म्हणजे फक्त संबंधांपुरती हवी असते. ती त्याला नकार देते. मुलगा झिंगाट होतो. तिला दम देतो. तोंडावर अ‍ॅसिड फेकीत तुझ्या घरात येऊन नासवीन. ही भाषा होते. त्यातून विपरीतच घडतं. तेव्हाही मुलगा एकाकीच असतो. हा आजचा तरुण. दिशाहीन. त्याच्यात प्रचंड ऊर्जा आहे. तो खूप काही करू शकतो. त्याला वापरणारे आणि वापरू देणारे शोधायला हवेत. महामानव जन्मभर हेच सांगत आले. तरुणांना पाहायला वेळ नाही. अधोगतीला पर्याय नाही. हे तरुण बदलायला हवेत. ते योग्य मार्गाने जायला हवेत. मगच म्हणू या माय ब्रदर्स अ‍ॅण्ड सिस्टर्स! 

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिकnewsबातम्या