शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

प्राणायामाविषयी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2018 20:54 IST

प्राणायाम ही योगी लोकांसाठीच असलेली योगक्रिया आहे, असा एक प्रवाद आहे़ सामान्य माणसाचा तो प्रांत नाही, असा समज आहे़

- डॉ. विजय जंगमप्राणायाम ही योगी लोकांसाठीच असलेली योगक्रिया आहे, असा एक प्रवाद आहे़ सामान्य माणसाचा तो प्रांत नाही, असा समज आहे़ ही गोष्ट हास्यास्पद आहे़ अहो, आपण जन्माआधीपासून श्वासोच्छ्वास करतो़ प्राणायामात मुख्य क्रिया, पायाभूत क्रिया श्वासोच्छ्वास हीच आहे़ या क्रियेचे नियंत्रण, नियोजन म्हणजे प्राणायाम़ असं असेल तर ती क्रिया सर्वसामान्यांसाठी नसावी हे असयुक्तिक होईल की नाही?प्राणायाम म्हणजे नियमानं, नियमित श्वसनक्रिया? अनियमितपणेही क्रिया होऊ शकते, होत असते़ अनियमित श्वसनाने धोके होऊन आजारीपण ते अकाली मृत्यू इथपर्यंतचा दंड सोसावा लागतो़ हे दुष्परिणाम होऊ नयेत म्हणूनच चांगली प्राणायामक्रिया शिकून घ्यायची, अंगीकारायची.

‘जेनो काम तेनो थाय’ या गुजराथी म्हणीप्रमाणे तोंडाने खावेप्यावे, बोलावे, नाकाने श्वसन उच्छ्वसन करावे! तोंडाने श्वास घेतल्यानं घशाचे, गळ्याचे, फुप्फुसाचे आजार होऊ शकतात़ नाकामध्ये दूषित हवेला आवश्यक तेवढं शुद्ध केलं जातं. तशी व्यवस्था तोंडात, गळ्यात नसते़ नाकावाटे नियंत्रित श्वास- प्रश्वास केल्यानं होणारी प्राणायामक्रिया आयुष्य वाढविते, निरोगीपणा वाढविते.

संगीताची लयबद्ध लकेर, तान किंवा वाद्यावरची गत ऐकून तुम्हाला बहुश: संतोष वाटतो़ विशिष्ट मात्रेची स्वरकंपनं विशिष्ट नाद करतात़ हे नाद आनंद, उत्साह, सुखद अनुभव देणारे तसेच दु:ख, भय उभे करणारे- वाढविणारे असतात़ लयीसोबत ताल असेल तर साध्या गीताचं संगीत होतं़ तेच तालबद्ध श्वसन-प्रश्वसन केल्यानं होतं. सीत्कारी, भस्त्रिका यांच्या लयबद्ध आवृत्तींमधून एक लयबद्ध संगीत सुरावट ऐकू येते़

आता काही शंकेखोर म्हणतील तुमचा प्राणायाम दहा-पंधरा मिनिटांपुरता, फार फार तर अर्धा तास़ दिवसभराचे तास चोवीस़ अगदी दोनेक तास प्राणायाम केला तरी बाकीच्या बावीस तासांचं काय? त्यावर आम्ही म्हणू पुलावर मंदगतीनं वाहनं चालवावीत अशा सूचना लावतात, त्या का? तर लयबद्ध (विशिष्ट) गतीनं वाहन चाललं तरच पूल त्याचा भार सहन करू शकेल़ तेव्हा तालबद्धतेत विशिष्ट प्रमाणात शक्ती असते़ गरजेहून जास्त पाणी प्यायलात तर पोटाला तडस लागते़ तेव्हा गरजेहून जास्त शक्ती व्यय करू नये़ सुरुवातीला पाच-दहा मिनिटे इतका माफक वेळ प्राणायामासाठी पुरतो, त्यातून शरीर शक्तीसंचय सहन करेल एवढीच शक्ती भरली जाते.

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक