सेल्फीचं वेड जीवावर बेतलं, पैनगंगेत बुडून दोघांचा मृत्यू तर एक गंभीर

By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2018 04:23 PM2018-09-20T16:23:45+5:302018-09-20T16:34:47+5:30

पैनगंगा नदीत अघोळीसाठी आल्यानंतर युवकाना तेथे एक नाव दिसली. त्या नावेला बघून सेल्फी काढण्याची इच्छा या तरुणांची झाली होती.

Youth trying selfie in river, 2 dead after sunk in Painganga | सेल्फीचं वेड जीवावर बेतलं, पैनगंगेत बुडून दोघांचा मृत्यू तर एक गंभीर

सेल्फीचं वेड जीवावर बेतलं, पैनगंगेत बुडून दोघांचा मृत्यू तर एक गंभीर

Next

यवतमाळ - तालुक्यातील राजूर (गो) येथे मोहरम सणासाठी आदिलाबाद येथील 5 युवक एक दिवस आधीच आले होते. सकाळी साडे नऊ वाजता हे पाच युवक सवारीच्या बंगल्यामागे गावाला लागूनच असलेल्या पैनगंगा नदीत आंघोळीसाठी गेले. मात्र, या अंघोळीवेळी नदीपात्रातसेल्फी घेणे या युवकांच्या जीवावर बेतलं आहे. कारण, नदीत सेल्फी घेताना पाण्यात बुडून दोघांचा मृत्यू झाला असून एकाची प्रकृती चिंताजनक आहे.   

पैनगंगा नदीत अघोळीसाठी आल्यानंतर युवकाना तेथे एक नाव दिसली. त्या नावेला बघून सेल्फी काढण्याची इच्छा या तरुणांची झाली होती. या पाचही युवकांनी त्या नावेवर बसून सेल्फी काढताना नावेचा तोल जाऊन ते पाण्यात बुडाले. तिथे खोल डोह असल्याने त्यांना लवकर पाण्यातून बाहेर येणे शक्य झाले नाही. त्यापैकी शेख अर्षद (14वर्षे), शेख सुफिर सिराज (16 वर्षे), हे दोघे मृत्यू पावले तर सय्यद उमेद (18 वर्षे) हा गंभीर असल्याने त्याला मुकुटंबन येथील प्राथमिक रुग्णालयातून उपचार करून पुढील उपचारासाठी वणी येथे रेफर करण्यात आले आहे. तर यातील दोघांनी पाण्याशी संघर्ष करीत कसाबसा आपला जीव वाचविला. नदीपात्रात बुडालेले सर्वचजण तेलंगणाच्या आदिलाबद येथील रहिवासी आहेत. विशेष म्हणजे दरवर्षी राजूर येथे मोहरम सणानिमित्त त्यांचा परिवार येतो. त्यामुळेच या वर्षीही ते मोहरमसाठी आले होते. दरम्यान, राजूरपासून हाकेच्या अंतरावरच ही घटना घडली. बाजूलाच असलेल्या मच्छिमाराने आरडा ओरड करून गावाला माहिती दिली व राजूर येथील युवकांनी तात्काळ या तिघांना मुकुटंबन प्राथमिक रुग्णालयात दाखल केले. मात्र, तत्पूर्वी डाक्टरांनी दोघांना मृत घोषित केले व त्यांना झरी येथे उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आले. 

Web Title: Youth trying selfie in river, 2 dead after sunk in Painganga

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.