छत्रपती शिवराय प्रतिष्ठानतर्फे कार्यशाळा

By admin | Published: September 5, 2016 01:00 AM2016-09-05T01:00:03+5:302016-09-05T01:00:03+5:30

छत्रपती शिवराय प्रतिष्ठान आणि युवा परिवर्तन मंचतर्फे ‘भविष्य उद्याचे’ तसेच ‘मुलींची सुरक्षा व सतर्कता’ या विषयावर कार्यशाळा पार पडली.

Workshop by Chhatrapati Shivrajaya Pratishthan | छत्रपती शिवराय प्रतिष्ठानतर्फे कार्यशाळा

छत्रपती शिवराय प्रतिष्ठानतर्फे कार्यशाळा

Next

यवतमाळ : छत्रपती शिवराय प्रतिष्ठान आणि युवा परिवर्तन मंचतर्फे ‘भविष्य उद्याचे’ तसेच ‘मुलींची सुरक्षा व सतर्कता’ या विषयावर कार्यशाळा पार पडली.
अमोलकचंद महाविद्यालयात दोन सत्रात ही कार्यशाळा झाली. कार्यक्रमाला डॉ. गिरीश माने, एपीआय राखी गेडाम, अ‍ॅड. क्रांती धोटे, अ‍ॅड. सीमा तेलंगे, आशीष कुळसंगे, अमोलकचंद महाविद्यालयाचे प्राचार्य मिश्रा आदी उपस्थित होते. यावेळी एपीआय राखी गेडाम यांनी मुलींना कुठल्याही तक्रारीसाठी १०९१ हा हेल्पलाईन नंबर दिला तसेच सुरक्षेबद्दल मार्गदर्शन केले. अ‍ॅड. तेलंगे यांनी कायदेविषयक माहिती दिली. लैंगिक शिक्षणाबद्दल डॉ. माने यांनी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन युवा परिवर्तन मंचच्या शिवानी जाधव यांनी केले. तुषार भोयर, सूरज गुप्ता, राहुल कानारकर, श्याम सोळंके, प्रतीक सबने, निखील गावंडे, विनायक गेडाम, प्रितम भवरे, आकाश ब्राह्मणकर, गोलू बारडे, नंदकिशोर ठाकरे, अविनाश गोटफोडे, दीक्षा मिश्रा, मयुरी कदम, प्रांजली वैद्य, पूजा राऊत, अमृता राऊत, अश्विन भोगे, रितेश बोबडे, धीरज सिंगानिया, प्रणव अग्रवाल, अक्षय सावंत, शेखर सरकटे, मनिष पांडे, युवराज मुनेश्वर, शुभम इंगळे, निकेत मानकर, गणेश बदकी, अभिजित जयस्वाल, प्रतीक अवचित, प्रणव राठोड, प्रकाश घोटेकर आदी उपस्थित होते. (स्थानिक प्रतिनिधी)

Web Title: Workshop by Chhatrapati Shivrajaya Pratishthan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.