विवाहितेसह तरुणाची विहिरीत उडी मारुन आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2018 07:52 PM2018-04-15T19:52:43+5:302018-04-15T19:52:43+5:30

पोलिसांकडून प्रकरणाचा तपास सुरू

two person commits suicide in yavatmal | विवाहितेसह तरुणाची विहिरीत उडी मारुन आत्महत्या

विवाहितेसह तरुणाची विहिरीत उडी मारुन आत्महत्या

Next

यवतमाळ : शहरातील लोहारा येथील पाणीपुरवठा विहिरीत विवाहितेसह तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक बाब रविवारी सकाळी उघडकीस आली. विवाहिता पाच दिवसापासून बेपत्ता असल्याची तक्रार तिच्या कुटुंबीयांनी लोहारा पोलीस ठाण्यात दिली होती. 

लक्ष्मी मुकेश यादव (वय ३० वर्षे, रा. साने गुरुजीनगर, लोहारा) आणि प्रफुल्ल मधुकर झिगे (वय २८ वर्षे रा. महादेव मंदिर परिसर, लोहारा) अशी आत्महत्या केलेल्यांची नावं आहेत. प्रफुल्ल हा अविवाहित आहे, तर लक्ष्मी हिचा विवाह झाला असून तिला एक मुलगा आहे. लक्ष्मी ११ एप्रिलपासून बेपत्ता असल्याची तक्रार लोहारा ठाण्यात देण्यात आली होती. येथील स्मशानभूमी परिसरात ग्रामपंचायतीने पाणी पुरवठ्यासाठी विहीर खोदली होती. नेहमीप्रमाणे टँकर रविवारी सकाळी विहिरीवर भरण्यासाठी गेले असता त्यात दोन मृतदेह तरंगताना दिसले. यानंतर लोहारा पोलिसांना याची माहिती देण्यात आली. नागरिकांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढल्यानंतर दोघांचीही ओळख पटली. शनिवारी रात्री या दोघांनी आत्महत्या केली असावी अशी शक्यता वर्तविली जात आहे. 
 

Web Title: two person commits suicide in yavatmal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.