वणीमार्गे जनावरांची तस्करी सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2018 09:46 PM2018-04-14T21:46:34+5:302018-04-14T21:46:34+5:30

कत्तलीसाठी जनावरांची वणी मार्गे तस्करी सुरूच आहे. नागपूर ते आदिलाबाद मार्गावरील पोलिसांना गुंगारा देत वणीमार्गे जनावरांना ट्रकद्वारे नेण्याचा प्रयत्न शुक्रवारी रात्री उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या पथकाने उधळून लावला. या कारवाईत ३४ जनावरांना पोलिसांनी जीवदान दिले.

Trafficking animals through Wife | वणीमार्गे जनावरांची तस्करी सुरूच

वणीमार्गे जनावरांची तस्करी सुरूच

Next
ठळक मुद्दे३४ जनावरांना जीवदान : साडेतेरा लाखांचा मुद्देमाल जप्त, एसडीपीओ पथकाची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्क
वणी : कत्तलीसाठी जनावरांची वणी मार्गे तस्करी सुरूच आहे. नागपूर ते आदिलाबाद मार्गावरील पोलिसांना गुंगारा देत वणीमार्गे जनावरांना ट्रकद्वारे नेण्याचा प्रयत्न शुक्रवारी रात्री उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या पथकाने उधळून लावला. या कारवाईत ३४ जनावरांना पोलिसांनी जीवदान दिले. ट्रकसह एकूण १३ लाख ६० हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.
जनावरांच्या तस्करीचे मुख्य केंद्र असलेल्या नागपुरातून दररोज शेकडो जनावरांना कत्तलीसाठी तेलंगाणातील आदिलाबाद येथे नेले जात आहे. शुक्रवारी जनावरांनी भरलेला एक ट्रक वणीमार्गे आदिलाबादकडे जाणार असल्याची गोपनिय माहिती वणीचे उपविभागीय पोलीस अधिकारी विजय लगारे यांना मिळाली. त्यानंतर त्यांच्या विशेष पथकाने वणी शहरालगतच्या चंद्रपूर मार्गावरील टोलनाक्याजवळ शुक्रवारी रात्री सापळा रचला. दरम्यान, नागपूरकडून एक संशयास्पद ट्रक टोलनाक्याजवळ पोहचताच, पोलीस पथकाने त्या ट्रकला अडविले असता, ट्रकचालकाने ट्रकसह पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र पथकातील पोलिसांनी जीव धोक्यात टाकून ट्रकचालकाच्या मुसक्या आवळल्या. ट्रकची तपासणी केली असता, ट्रकमध्ये तब्बल ३४ बैल निर्दयपणे कोंबून असल्याचे आढळून आले. पोलिसांनी ट्रक ताब्यात घेतला. यावेळी ट्रकचालक शेख महेफूस शेख महेबूब (२५) रा.आझादनगर नागपूर व इम्रानखान करीम खान पठाण (३०) रा.नागमंदिर गोधणी रोड नागपूर या दोघांना अटक करण्यात आली. त्यांच्याविरुद्ध कलम ११ घ.ड.झ.प्राणीमात्रांना निर्दयपणे वागणूक देणे प्रती कायदा सहकलम ५ अ.ब.प्राणी संरक्षक कायदा व ४२९, ३४ भादंवि ८३, १७७ मोवाका प्रमाणे गुन्हा नोंदवून तपासात घेतला. जनावरांची सुटका करण्यात आल्यानंतर सर्व जनावरांना रासा येथील गुरू गणेश गोशालेत दाखल करण्यात आले. सुटका करण्यात आलेल्या जनावरांची किंमती सहा लाख ६० हजार रुपये आहे. ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी विजय लगारे यांच्या मार्गदर्शनाखाली नायक पोलीस दिलीप अडकीने पोलीस शिपाई आशिष टेकाडे, रवी ईसनकर, संतोष अण्णा यांनी पार पाडली.
पोलिसांच्या कारवाया वाढल्याने मधल्या काळात जनावरांची तस्करी थंडावली होती. मात्र तस्करांनी पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. नागपूर हे जनावरांच्या तस्करीचे मुख्य केंद्र बनले आहे. तेथून आदिलाबादकडे जनावरांना कत्तलीसाठी नेले जाते. नागपूर ते आदिलाबादपर्यंत अनेक पोलीस ठाणी लागतात. परंतु पोलिसांचे सुरक्षा कवच भेदून जनावरांना कत्तलीसाठी नेले जात आहे. तस्करीचे फार मोठे रॅकेट सक्रीय असल्याचे बोलले जाते.

Web Title: Trafficking animals through Wife

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.