‘वायपीएस’मध्ये शिक्षक प्रशिक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2018 10:24 PM2018-06-13T22:24:15+5:302018-06-13T22:24:15+5:30

शिक्षण क्षेत्रात नवनवीन बदल होत असतात. याविषयी शिक्षकांना माहिती व्हावी, होत असलेले बदल स्वीकारून त्यासाठी तत्पर राहता यावे, याकरिता यवतमाळ पब्लिक स्कूलमध्ये शिक्षकांसाठी विविध शैक्षणिक कार्यशाळा घेतल्या जातात.

Teacher training in 'Yps' | ‘वायपीएस’मध्ये शिक्षक प्रशिक्षण

‘वायपीएस’मध्ये शिक्षक प्रशिक्षण

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : शिक्षण क्षेत्रात नवनवीन बदल होत असतात. याविषयी शिक्षकांना माहिती व्हावी, होत असलेले बदल स्वीकारून त्यासाठी तत्पर राहता यावे, याकरिता यवतमाळ पब्लिक स्कूलमध्ये शिक्षकांसाठी विविध शैक्षणिक कार्यशाळा घेतल्या जातात. याच अनुषंगाने ‘टीम बिल्डींग’ (संघाची एकता) या विषयावर कार्यशाळा घेण्यात आली.
या कार्यशाळेला प्रमुख मार्गदर्शक म्हणून जेसीस कॉटन सिटी क्लबच्या माजी अध्यक्ष निशा चांडक लाभल्या होत्या. सध्या त्या मुंबई येथे कार्यरत आहे. त्यांना राष्ट्रीय श्रेष्ठ वक्ता हा पुरस्कार दोनदा प्राप्त झाला आहे. आजच्या स्पर्धेच्या युगात निरंतर होणाऱ्या बदलाला समजून आणि त्यादृष्टीकोनातून स्वत:मध्ये बदल करणे आवश्यक झालेले आहे. याच विषयावर निशा चांडक यांनी मार्गदर्शन केले.
शिक्षकांना संघाची एकता, त्याचे महत्त्व, त्यापासून होणारे सकारात्मक बदल निशा चांडक यांनी समजावून सांगितले. शैक्षणिक क्षेत्रात होणारे बदल कशा प्रकारे स्वीकारले जाऊ शकते, समुहाने कार्य करत असताना निर्माण होणाºया अडचणी कशा पद्धतीने दूर केल्या जाऊ शकतात याविषयी त्यांनी माहिती दिली. आपला दृष्टीकोन सकारात्मक ठेवा, नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करा, आपल्या शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना आपले समजून यशाच्या शिखराकडे न्या, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. या कार्यशाळेचे संचालन रूक्साना बॉम्बेवाला यांनी केले. आभार अर्चना कढव यांनी मानले. कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनाबद्दल शाळा समितीचे अध्यक्ष किशोर दर्डा, प्राचार्य जेकब दास यांनी आयोजकांचे कौतुक केले.

Web Title: Teacher training in 'Yps'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Schoolशाळा