दारव्हा येथे पेट्रोलपंपवर दुचाकीने घेतला पेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2019 10:31 PM2019-04-11T22:31:52+5:302019-04-11T22:32:26+5:30

येथील एका पेट्रोल पंपावर एका दुचाकीने अचानक पेट घेतला. काही युवकांनी लगेच धाव घेऊन आग विझविली व दुचाकी पंपावरून ओढत रस्त्यावर नेली. यामुळे मोठा अनर्थ टळला. ही घटना बुधवारी सायंकाळी ७.३0 वाजता घडली.

Stomach bikes on the petrol pump at Darwah | दारव्हा येथे पेट्रोलपंपवर दुचाकीने घेतला पेट

दारव्हा येथे पेट्रोलपंपवर दुचाकीने घेतला पेट

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
दारव्हा : येथील एका पेट्रोल पंपावर एका दुचाकीने अचानक पेट घेतला. काही युवकांनी लगेच धाव घेऊन आग विझविली व दुचाकी पंपावरून ओढत रस्त्यावर नेली. यामुळे मोठा अनर्थ टळला. ही घटना बुधवारी सायंकाळी ७.३0 वाजता घडली.
येथील आर्णी मार्गावर बसस्थानकापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या एका पेट्रोल पंपावर उभ्या असलेल्या एका दुचाकीने बुधवारी सायंकाळी अचानक पेट घेतला. पेट्रोल पंपावरच ही घटना घडल्याने या ठिकाणी पेट्रोल, डीझेल भरायला मोठ्या संख्येने आलेल्या वाहनधारकांना धडकी भरली होती. त्यामुळे धावपळ सुरू झाली. मात्र प्रसंगावधान राखून काही युवक मोठ्या हिमतीने मदतीला धावले. गोपाल भोयरसह काही युवक व पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांनी आग विझविण्याच्या यंत्राद्वारे आग विझविण्याचा प्रयत्न केला. महेंद्र शेटे याने पेटत्या दुचाकीत शेला अडकवून दुचाकीला पेट्रोल पंपावरून ओढत रस्त्यावर नेले. यानंतर आग पूर्णत: विझविण्यात आली. तेव्हा सर्वांनी सुटकेचा निश्वास टाकला.
युवक वेळीच धावून गेल्याने मोठा अनर्थ टळला. अन्यथा पेट्रोल पंपाला धोका निर्माण होऊन मोठी घटना घडण्याची शक्यता होती. दारव्हा शहराला आगीच्या मोठ्या धोक्यातून वाचविणाºया युवकांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Web Title: Stomach bikes on the petrol pump at Darwah

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.