नगरपरिषद स्थायी समितीचा जम्बो अजेंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 9, 2018 11:56 PM2018-10-09T23:56:54+5:302018-10-09T23:57:31+5:30

नगरपरिषदेच्या स्थायी समितीची सभा गुरुवारी होत आहे. या सभेसाठी तब्बल ११० विषय असलेला अजेंडा तयार करण्यात आला आहे. वैशिष्ट्यपूर्ण कामासाठीचे अनुदान, दलितोत्तर योजना, दलित वस्ती सुधार, .....

Standing Committee on the Jumbo Agenda of the Council of Ministers | नगरपरिषद स्थायी समितीचा जम्बो अजेंडा

नगरपरिषद स्थायी समितीचा जम्बो अजेंडा

Next
ठळक मुद्देयवतमाळ : ११० विकास कामांचा प्रस्ताव, रस्ते-नाल्यांची कामे

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : नगरपरिषदेच्या स्थायी समितीची सभा गुरुवारी होत आहे. या सभेसाठी तब्बल ११० विषय असलेला अजेंडा तयार करण्यात आला आहे. वैशिष्ट्यपूर्ण कामासाठीचे अनुदान, दलितोत्तर योजना, दलित वस्ती सुधार, नगरोत्थान महाअभियान योजना अशा विविध योजनांमधून प्राप्त निधीतून प्रस्तावित कामांना मान्यता देण्यासाठी ठेवले जाणार आहे.
वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून नाट्यगृहाच्या परिसरात सेफ्टीक टँक व पाण्याच्या टाकीचे बांधकाम, इमारतीतील अतिरिक्त बांधकामासाठी प्राप्त निविदांना मान्यतेसाठी ठेवले जाणार आहे. त्याशिवाय दलितोत्तर याजनेंतर्गत जामनकरनगर, गुरुनानकनगर परिसरातील रस्ता डांबरीकरण, काँक्रिट नाली, बसस्थानक चौक, एलआयसी चौक, जिल्हा न्यायालयापर्यंत दोन्ही बाजूने काँक्रिट नाली, फुटपाथ, अरुणोदय सोसायटी, भोसा रोड रस्ता रूंदीकरण व डांबरीकरण ही कामे प्रस्तावित आहेत. नगरोत्थान महाभियान योजनेंतर्गत प्रभाग क्र.१ मध्ये रस्ता रूंदीकरण, डांबरीकरण प्रस्तावित आहे. याशिवाय प्रभाग १ ते २८ पर्यंत सर्वच प्रभागांमध्ये नाली, रस्ता याची कामे प्रस्तावित केली आहेत. नगरसेवकांकडून प्राप्त प्रस्ताव यावरून या कामांची निवड झाली आहे. नगरपरिषद हद्दीतील ट्राफिक सिग्नल साहित्याची देखभाल दुरुस्ती निविदा मंजूर केली जाणार आहे. पालिका इमारतीला आॅटोमॅटिक चेन ओव्हर पॅनल व जनरेटर बसविणे, तलावफैल शैचालयात मोटरपंप लावण्यास मान्यता, झोन क्र.१ ते ४ मधील हातपंप दुरुस्तीच्या निविदांना मंजूरी, अग्नीशमनसाठी साहित्य खरेदी, आरोग्य विभागात सफाई कर्मचाऱ्यांसाठी साहित्य खरेदी, कचरा डेपोवरील गांडुळ खत प्रकल्प चालविणे अशा कामांना मान्यतेसाठी समितीपुढे ठेवण्यात येणार आहे. नगरपरिषदेत पहिल्यांदाच सर्वच प्रभागातील रस्ते, नाल्या व इतर कामे मंजुरीसाठी ठेवण्यात आली आहे. आतापर्यंत प्रभागात अपवादानेच कामे झाल्याचे दिसून येते. या निविदा प्रक्रिया पूर्ण करून कामांची सुरुवात कुठल्याही राजकीय श्रेयाशिवाय सुरू व्हावी, जेणेकरून नागरिकांना दिलासा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
घरोघरी जाऊन कचरा संकलनासाठी आॅटो
नगरपरिषदेने घरोघरी जाऊन कचरा संकलनासाठी १४ व्या वित्त आयोगातून चार ट्रॅक्टर व ६२ हायड्रोलिक आॅटो खरेदी केले आहेत. या नव्या प्रक्रियेत ओला-सुका कचरा वर्गीकरण करून संकलित केला जाणार आहे. त्यासाठी कमी दराच्या निविदेला प्रशासकीय वित्तीय मान्यता दिली जाणार आहे.

Web Title: Standing Committee on the Jumbo Agenda of the Council of Ministers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.