गंगाबाईसाठी समाजमन गहिवरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2017 09:56 PM2017-08-17T21:56:05+5:302017-08-17T21:56:37+5:30

पुसद तालुक्यातील हर्षी येथील गंगाबाई काळे या झोपडीत राहणाºया महिलेची आणि तिच्या मुलांच्या शिक्षणाची होणारी गैरसोय ‘लोकमत’ने प्रसिद्ध करताच संपूर्ण समाजमन गहिवरले.

Society for the Ganges | गंगाबाईसाठी समाजमन गहिवरले

गंगाबाईसाठी समाजमन गहिवरले

Next
ठळक मुद्देमदतीचा हात : झोपडीतील चिल्यापिल्यांची केली शिक्षणाची सोय

लोकमत न्यूज नेटवर्क
हर्षी : पुसद तालुक्यातील हर्षी येथील गंगाबाई काळे या झोपडीत राहणाºया महिलेची आणि तिच्या मुलांच्या शिक्षणाची होणारी गैरसोय ‘लोकमत’ने प्रसिद्ध करताच संपूर्ण समाजमन गहिवरले. अनेकांनी मदतीचा हात दिला. विविध सामाजिक संस्था आणि सहृदयी माणसांच्या मदतीतून आता गंगाबार्इंच्या चिलापिल्यांच्या शिक्षणाची सोय झाली आहे.
‘दोन घासाची सोय नाही... म्हणजे गणवेश आधी घ्या बाई!’ असे वृत्त ‘लोकमत’ने १० आॅगस्ट रोजी प्रकाशित केले. यात गंगाबाई काळे आणि तिच्या पाच मुली आणि एका मुलाची कहाणी प्रसिद्ध केली. त्यांनतर मदतीचा ओघ सुरू झाला. मारेगाव येथील संतकृपा बचत गटाने तत्काळ दहा हजार रुपयांची मदत केली. अध्यक्ष दुष्यंत जयस्वाल, उपाध्यक्ष प्रवीण कुसनकर, सचिव रामभाऊ सिडाम, कोषाध्यक्ष प्रदीप मत्ते, सहसचिव रवींद्र पोटे, सदस्य श्रीराम सिडाना, राजू जयस्वाल, प्रफुल्ल रासेकर, विप्लव ताकसांडे, आकाश खुराणा, शैलेश दुग्गड, अजय ठमके, विजय धुर्वे, राजू किन्हेकार, भाऊ पोटे, संदीप लोणारे, शे.एजाज, सुशील जंगेवार यांनी दहा हजार रुपयांचा धनादेश लोकमत जिल्हा कार्यालयाच्या सुपूर्द केला. तर यवतमाळ येथील सेवानिवृत्त उपायुक्त पी.बी. आडे यांनी थेट हर्षी गाठून गंगाबाईच्या मुलांसाठी गणवेशाला आर्थिक मदत केली. यावेळी दिग्रस पंचायत समिती सदस्य अरविंद गादेवार, बाबूसिंग जाधव, पंजाब जाधव, पुरुषोत्तम कुडवे उपस्थित होते. हर्षीचे सरपंच बाळासाहेब नाईक, शिवाजी पवार, शेख मोहीन, शेख मनसब, संतोष खिराडे, लोकमत तालुका प्रतिनिधी अखिलेश अग्रवाल, मुख्याध्यापक प्रमिला झुकझुके उपस्थित होते. पुसद शहरचे ठाणेदार वाघू खिल्लारे आणि त्यांच्या पत्नी मंदाताई खिल्लारे यांनी पाच हजार रुपयांची मदत दिली. पुसद येथील व्यंकटेश ड्रेसेसचे खंडूअण्णा येरावार यांनीही पाच हजार रुपयांची मदत केली, तर संजय रेकावार, दीपक हरिमकर, संजय हनवते, संतोष मस्के, मनोहर बोंबले, अब्दुल हमीद, चंपत राठोड, भाऊ प्रतापवार, मनीष दशरथकर, प्रदीप नरवाडे, मंगेश पवार, किशोर पोवाडे, विष्णू धुळे या पुसदकरांनी मदतीचा हात दिला. यवतमाळ येथील शिक्षक आसाराम चव्हाण यांनी तीन हजार रुपयांची मदत केली. जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष डॉ.आरतीताई फुपाटे आणि पंचायत समितीच्या माजी सभापती आशाताई पांडे यांनी दहा हजार रुपयांची मदत दिली.
लोकमतच्या सामाजिक बांधिलकीतून वृत्त प्रकाशित झाले. समाजमन गहिवरले आणि गंगाबार्इंसाठी मदतीचा हात पुढे केला. या मदतीतून गंगाबार्इंच्या मुलांच्या शिक्षणाची सोय होणार आहे.
मुलींचे लग्न अन् शिक्षणाचा खर्च
गंगाबाई काळे या महिलेची करुण कहाणी वाचून यवतमाळ येथील मोबाईल व्यावसायिक व्यथित झाला. त्यांनी थेट हर्षी गाठले. पाच मुलींच्या लग्नाचा आणि शिक्षणाचा खर्च करण्याचा गंगाबाईला शब्द दिला. तसेच या पाचही मुलींना पुसद येथे आणून रुग्णालयात त्यांची तपासणी केली. औषधोपचार केले. तसेच त्या मुलींना शालेय गणवेशाव्यतिरिक्त कपडेही घेवून दिले. मात्र या अनामिक दात्याने आपले नाव सांगण्यास नकार दिला. या हाताचे दान त्या हातालाही कळू नये, अशी त्यांची भावना आहे. यवतमाळ येथील या व्यावसायिकाने अनेकदा विचारूनही आपले नाव सांगितले नाही. या अनामिक दात्याने गंगाबाईच्या पुढील सर्व समस्याच दूर करण्याचा निर्धार केला. असेच अनेक अनामिक दातेही गंगाबार्इंसाठी ‘लोकमत’च्या माध्यमातून पुढे आलेत.

Web Title: Society for the Ganges

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.