४५ हजार हेक्टरवरील कपाशी उद्ध्वस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2017 11:00 PM2017-12-06T23:00:59+5:302017-12-06T23:01:16+5:30

यंदा कपाशीवर गुलाबी बोंडअळीने आक्रमण केल्याने वणी तालुक्यातील ४५ हजार ८०० हेक्टरवरील कपाशीचे पीक उद्ध्वस्त झाले. त्यामुळे शेतकऱ्यांना लाखो रुपयांचा फटका बसला आहे.

Ruined 45,000 hectares of cotton | ४५ हजार हेक्टरवरील कपाशी उद्ध्वस्त

४५ हजार हेक्टरवरील कपाशी उद्ध्वस्त

Next
ठळक मुद्देशेतकरी देशोधडीला : मदतीची प्रतीक्षा, नव्या हंगामासाठी पैैशाची जुळवाजुळव

आॅनलाईन लोकमत
वणी : यंदा कपाशीवर गुलाबी बोंडअळीने आक्रमण केल्याने वणी तालुक्यातील ४५ हजार ८०० हेक्टरवरील कपाशीचे पीक उद्ध्वस्त झाले. त्यामुळे शेतकऱ्यांना लाखो रुपयांचा फटका बसला आहे. शासनस्तरावर बोंडअळीग्रस्तांना मदत देण्याच्या गप्पा सुरू असल्या तरी प्रत्यक्षात ती मदत शेतकऱ्यांपर्यंत केव्हा पोहचेल, याबाबत संभ्रम आहे.
यासंदर्भात महसूल मंत्र्यांनी मंगळवारी घोषणा केली. एनडीआरएफमार्फत बोंडअळीग्रस्त शेताची पाहणी करून त्यानंतर शेतकºयांना मदत दिली जाईल असे त्यांनी सांगितले. मात्र या मदतीला ‘कर्जमाफी’चे स्वरूप तर येणार नाही ना, अशी शंका शेतकऱ्यांमध्ये व्यक्त केली जात आहे. शासनाने शेतकºयांचे कर्ज माफ केल्याची घोषणा केली. मात्र अद्याप प्रत्यक्षात एक खडकूही शेतकºयांच्या कर्जखात्यात जमा झाला नाही, हे विशेष. यंदा बोंडअळीच्या संकटाने शेतकरी देशोधडीला लागला आहे.
वणीसह झरी, मारेगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणावर कपाशीचे उत्पन्न घेतले जाते. त्यात बिटी बियाणांची लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते. यंदा वणी तालुक्यात ४५ हजार ८०० हेक्टरवर कपाशीची लागवड करण्यात आली. मात्र कधी नव्हे ईतका बोंडअळीचा प्रकोप झाल्याने एका वेचणीनंतरच कपाशी उद्ध्वस्त झाली. दरवर्षी फेबु्रवारीपर्यंत शेतात कापसाची झाडे उभी असतात.
यादरम्यान, दहापेक्षा अधिक कापूस वेचण्या होतात. मात्र यावर्षी एका कापूस वेचणीनंतरच सर्वच कापूस बोंडांना गुलाबी बोंडअळीने पोखरून टाकले. विशेष म्हणजे ही अळी बोंडात शिरून स्वत:च्या विष्ठेने बोंडाची सुक्ष्म छित्रे बंद करते. त्यामुळे बोंडावर कोणत्याही औैषधांची फवारणी केली तरी त्याचा परिणाम अळीवर होत नाही. कृषी विभागाकडून वारंवार फवारणीचा सल्ला देण्यात आला. मात्र ही फवारणी कुचकामी ठरली. ही अळी सहा महिन्यांपर्यंत कोष करून त्यात जीवंत राहू शकते. त्यामुळे कपाशीची झाडे जाळून टाकण्याचा सल्लाही देण्यात येत आहे. त्यामुळे बोंडअळीचा नायनाट होईल, असा दावा केला जात आहे.
कपाशीवर नांगर फिरवून रबीची तयारी
कपाशीचे पीक हातून गेल्याने अनेक शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील कपाशीवर नांगर फिरविले आहे. ज्यांच्याकडे ओलिताची सोय आहे, त्या शेतकºयांनी रबी हंगामासाठी मशागत सुरू केली आहे. मात्र ज्यांच्याकडे सिंचनाची सोय नाही, अशा शेतकऱ्यांचे शेत मात्र खरीप हंगामापर्यंत मोकळे राहणार आहे. एकूणच यावर्षी आलेल्या संकटामुळे शेतकरी हतबल झाला आहे. कपाशीचे उत्पादनही निम्म्यापेक्षाही कमी झाल्याने, कर्जाची परतफेड कशी करावी, हा प्रश्न शेतकऱ्यांना छळत आहे.

Web Title: Ruined 45,000 hectares of cotton

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.