आदिवासींच्या समस्यांवर उपाययोजना व्हाव्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2017 09:51 PM2017-12-04T21:51:18+5:302017-12-04T21:51:49+5:30

आदिवासी समाजातील लोकप्रतिनिधींनी आपल्या समाजाच्या समस्यांचा यथोचित अभ्यास करून त्यावर उपाययोजना कराव्या.

Remedies for tribal problems | आदिवासींच्या समस्यांवर उपाययोजना व्हाव्या

आदिवासींच्या समस्यांवर उपाययोजना व्हाव्या

Next
ठळक मुद्देमाधव सरकुंडे : आदिवासी मुक्ती दलाच्या संयोजनात व्याख्यान, आश्रमशाळांचे प्रश्न मांडले

आॅनलाईन लोकमत
यवतमाळ : आदिवासी समाजातील लोकप्रतिनिधींनी आपल्या समाजाच्या समस्यांचा यथोचित अभ्यास करून त्यावर उपाययोजना कराव्या. उपाययोजना झाल्या तरच आदिवासींची प्रगती शक्य आहे, असे मत प्रा.डॉ. माधव सरकुंडे यांनी मांडले.
आदिवासी मुक्ती दलाच्या संयोजनात रविवारी ‘भारतीय संविधान आणि लोकप्रतिनिधींचे दायित्व’ या विषयावर व्याख्यान झाले. यात प्रमुख वक्ते म्हणून प्रा. सरकुंडे बोलत होते. माजी शालेय शिक्षणमंत्री प्रा. वसंत पुरके अध्यक्षस्थानी होते.
प्रा. सरकुंडे म्हणाले, आदिवासींच्या प्रगतीचा जाहीरनामाच भारतीय संविधानात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मांडला. त्यांना स्वतंत्र स्वायत्तता देऊन आदिवासींच्या विकासाचा मार्ग अधिक प्रशस्त करून ठेवला. आदिवासी समाजातील विद्यार्थी शिकला पाहिजे यासाठी आश्रमशाळा काढल्या. मात्र या शाळांची अवस्था दयनीय आहे. कुठलेही शैक्षणिक वातावरण त्याठिकाणी नाही. ही परिस्थिती बदलण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
या देशाच्या प्रगतीत जात हा सर्वात मोठा अडसर आहे. जोपर्यंत जात हद्दपार होणार नाही तोपर्यंत भारत हे राष्ट्र म्हणून उभे राहू शकत नाही. म्हणून येणाºया काळात जाती निर्मूलनाचा कार्यक्रम आपणा सर्वांना हाती घ्यावा लागेल, असे ते म्हणाले. प्रत्येक आदिवासींच्या घरात भारतीय घटनेची प्रत असणे आवश्यक आहे. आपण स्वत: दहा हजार रुपयांच्या प्रती उपलब्ध करून देऊ, असे त्यांनी यावेळी सांगितले.
प्रास्ताविक प्रमोद घोडाम यांनी केले. यावेळी भानुदास राजने, एम.के. कोडापे, बाळकृष्ण गेडाम, बाबाराव मडावी, संतोष पारधी, हनुमंत कुडमेथे, मनीषा तिरणकर, किरण कुंभरे, विनोद डवले, रेखा कन्नाके उपस्थित होते.
आरक्षणावर व्याख्यान
विमुक्त घुमंतू, बारा बलुतेदार, ओबीसी अतिपिछडा सेवा संघाच्या संयोजनात ‘आरक्षण, फुले-शाहू-आंबेडकर आणि एल.आर. नाईक पॅटर्न, केंद्रीय २७ टक्केचे विभाजन, सामाजिक न्यायाचे दुसरे पर्व’ या विषयावर व्याख्यान झाले. अखिल भारतीय तेली साहू महासभा (हैदराबाद)चे अध्यक्ष पी. रामकृष्णय्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी नवलकिशोर राठोड, बाबूसिंग कडेल, प्रा. एकनाथ पवार, राजेश चव्हाण, ज्ञानेश्वर गोरे, कवडू नगराळे, आनंद गायकवाड, संजय बोरकर, सुनील वासनिक, सिद्धार्थ भवरे, अशोक वानखडे, माया गोबरे, सुनीता काळे आदींची उपस्थिती होती.
मराठा सेवा संघातर्फे व्याख्यान
स्मृती पर्वात मंगळवार, ५ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता मराठा सेवा संघाच्या संयोजनात व्याख्यान होत आहे. ‘स्वातंत्र्याच्या ७० वर्षानंतरही आरक्षणाची गरज का?’ असा व्याख्यानाचा विषय आहे. प्रसिद्ध अभ्यासू वक्ते प्रवीण देशमुख हे प्रमुख वक्ते आहेत. मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष डॉ. दिलीप महाले अध्यक्षस्थानी राहतील.

Web Title: Remedies for tribal problems

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.