रेशन व केरोसीन परवानाधारकांचे धरणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2019 09:22 PM2019-02-11T21:22:33+5:302019-02-11T21:22:50+5:30

विविध मागण्यांना घेऊन रास्त भाव दुकानदार आणि केरोसीन परवानाधारकांनी सोमवारी येथील तिरंगा चौकात धरणे दिले. रास्त भाव दुकानदार, केरोसीन विक्रेता संघटनेंतर्गत महासंघाचे उपाध्यक्ष सुभाष कोसलगे आणि जिल्हाध्यक्ष भगवंत राऊत यांच्या नेतृत्त्वात धरणे देण्यात आले.

Ration and kerosene holders | रेशन व केरोसीन परवानाधारकांचे धरणे

रेशन व केरोसीन परवानाधारकांचे धरणे

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : विविध मागण्यांना घेऊन रास्त भाव दुकानदार आणि केरोसीन परवानाधारकांनी सोमवारी येथील तिरंगा चौकात धरणे दिले. रास्त भाव दुकानदार, केरोसीन विक्रेता संघटनेंतर्गत महासंघाचे उपाध्यक्ष सुभाष कोसलगे आणि जिल्हाध्यक्ष भगवंत राऊत यांच्या नेतृत्त्वात धरणे देण्यात आले.
रेशन दुकानदारांना किमान वेतनाप्रमाणे मानधन द्यावे, केरोसीनचे मासिक नियतन कमी झाल्याने कुटुंबाचा उदरनिर्वाह होईल एवढे मानधन मिळावे, एई-पीडीएसमधील त्रूटी त्वरित दूर कराव्या, सत्यापनाचा आर्थिक मोबदला देण्यात यावा, पुरवठा विभागात सुरू असलेला गोंधळ थांबविण्यात यावा आदी मागण्यांसाठी धरणे देण्यात आले. या आंदोलनासाठी जिल्हा उपाध्यक्ष रामराव गायकवाड, विठ्ठलराव काटकर, दयाराम गेडाम, अमोल आसुटकर, प्रवीण खडसे, मोहन व्यापारी, शारदा पांडे, दिलीप देशमुख, नामदेव पवार, नीता ठाकरे, जानूसिंग राठोड, अरविंद चिरडे, माला इंगोले, झिंगरूजी पिंपळशेंडे, सुरेश मंडपे, दिलीप वाघमारे, अशोक नाईकवाड, प्रवीण कर्णेवार, गजानन हामद, रमेश लढे, दिलीप निखाडे, सुरेश पेंदाम, रफिक खोकर, नंदू चव्हाण, मनीषा राठोड आदींनी पुढाकार घेतला.

Web Title: Ration and kerosene holders

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.