फुलसावंगीतील पुलाचा प्रश्न मार्गी लागणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2018 10:12 PM2018-06-09T22:12:54+5:302018-06-09T22:12:54+5:30

कब्रस्तानमध्ये अंत्यसंस्कार करण्यासाठी नाला ओलांडून जाताना पावसाळ्यात मुस्लीम बांधवांना त्रास सहन करावा लागतो. कित्येक वर्षापासून हा प्रकार सुरू आहे. खासदार राजीव सातव फुलसावंगीत ईफ्तार पार्टीसाठी आले असता हा प्रश्न त्यांच्यापुढे उपस्थित केला.

The question of the bridge in Phulasangi will be in progress | फुलसावंगीतील पुलाचा प्रश्न मार्गी लागणार

फुलसावंगीतील पुलाचा प्रश्न मार्गी लागणार

Next
ठळक मुद्देखासदारांचे आश्वासन : अंत्यसंस्कारासाठी प्रचंड त्रास

लोकमत न्यूज नेटवर्क
फुलसावंगी : कब्रस्तानमध्ये अंत्यसंस्कार करण्यासाठी नाला ओलांडून जाताना पावसाळ्यात मुस्लीम बांधवांना त्रास सहन करावा लागतो. कित्येक वर्षापासून हा प्रकार सुरू आहे. खासदार राजीव सातव फुलसावंगीत ईफ्तार पार्टीसाठी आले असता हा प्रश्न त्यांच्यापुढे उपस्थित केला. त्यांनी पुलाचा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले.
फुलसावंगी येथील कब्रस्तान गावानजीकच्या नाल्याच्या पैलतीरावर आहे. या नाल्यावर कोणताही पूल नाही. पावसाळ्यात नाला भरून वाहतो. अशा काळात कुणाचे निधन झाल्यास अंत्यसंस्कारासाठी यातना सहन कराव्या लागते. गुडघाभर पाण्यातून जावे लागते. हा प्रकार सुरुवातीला आमदार राजेंद्र नजरधने यांना सांगितला. त्यांनी नाबार्डमधून पुलासाठी प्रस्ताव दाखल केला. परंतु तांत्रिक अडचणीमुळे मंजुरी मिळाली नाही.
दरम्यान, खासदार राजीव सातव फुलसावंगी येथे आले होते. त्यावेळी मुस्लीम बांधवांसह शेतकऱ्यांनी त्यांच्याकडे पुलाची मागणी लावून धरली होती. यासाठी पाठपुरावा करण्याचे आश्वासन खासदार सातव यांनी दिले.

Web Title: The question of the bridge in Phulasangi will be in progress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.