मुंडन करून शेतकऱ्यांनी केला शासनाचा निषेध

By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2018 07:13 PM2018-01-21T19:13:58+5:302018-01-21T19:14:22+5:30

 विधिमंडळात बोंडअळी ग्रस्त शेतकऱ्यांची शासनाने जाहीर केलेली हेक्टरी ३० हजार ते ३७ हजार ची मदत सरसकट व विनाविलंब देण्यात यावी या मागणीसाठी यवतमाळ जिल्हा शेतकरी संघर्ष समिती,काँग्रेस ,मनसे, राष्ट्रीय युवा संघटन,शेतकरी संघटना,शेतकरी वारकरी संघटना,बेंबला कालवे संघर्ष समिती यांनी पुकारलेल्या चक्री धरणे आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशी शेतकऱ्यांनी आंदोलन स्थळी मुंडन करून शेतकऱ्यांच्या प्रश्नावर मूग गिळून बसलेल्या सरकार चा निषेध केला.

The protesters protested by the farmers protested | मुंडन करून शेतकऱ्यांनी केला शासनाचा निषेध

मुंडन करून शेतकऱ्यांनी केला शासनाचा निषेध

Next

यवतमाळ - विधिमंडळात बोंडअळी ग्रस्त शेतकऱ्यांची शासनाने जाहीर केलेली हेक्टरी ३० हजार ते ३७ हजार ची मदत सरसकट व विनाविलंब देण्यात यावी या मागणीसाठी यवतमाळ जिल्हा शेतकरी संघर्ष समिती,काँग्रेस ,मनसे, राष्ट्रीय युवा संघटन,शेतकरी संघटना,शेतकरी वारकरी संघटना,बेंबला कालवे संघर्ष समिती यांनी पुकारलेल्या चक्री धरणे आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशी शेतकऱ्यांनी आंदोलन स्थळी मुंडन करून शेतकऱ्यांच्या प्रश्नावर मूग गिळून बसलेल्या सरकार चा निषेध केला.
           स्थानिक तिरंगा चौकात गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या चक्री धरणे आंदोलनाचा आजचा दिवस पुसद विधानसभा मतदार संघाचे होता.शेतकऱ्यांच्या प्रश्नावर असंवेदनशील असलेल्या फडणवीस सरकारच्या निषेधार्थ तब्बल शेतकऱ्यांनी डोक्यावरील केस कापून (मुंडन) कोडग्या सरकारचा निषेध केला .तसेच तरुण कीर्तनकार नंदकुमार माळवे यांनी शेतकऱ्यांच्या व्यथा -वेदना बोलके करणारे भावपूर्ण कीर्तन सादर केले.उपस्थित शेतकऱ्यांनी आपल्या मनोगतातून     सत्तारूढ सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांवर जबर प्रहार केले.गेल्या तीन दिवसांपासून ३२०० च्या वर न सरकलेले सोयाबीन चे दर ,दरवर्षी होणारा तूर खरेदीचा सावळा गोंधळ ,या वर्षी खुल्या बाजारात ३५०० ते ४००० च्या घरात असलेले तुरीचे दर आणि अद्यापही सुरू न झालेली तुरीची खरेदी केंद्रे या सर्व   पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांमधील अस्वस्थता प्रकट केली.
             आजच्या या धरणे आंदोलनात मतदार संघातील शेतकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

Web Title: The protesters protested by the farmers protested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.