पुसदमध्ये अवतरली पंढरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2019 10:16 PM2019-07-12T22:16:19+5:302019-07-12T22:17:54+5:30

आषाढी एकादशीनिमित्त शुक्रवारी शहरात अवघी पंढरी अवतरली होती. येथील विठ्ठल मंदिरात वैष्णवांचा मेळा भरला होता. विठुनामाच्या गजराने शहर भारावून गेले होते. विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात आषाढी एकादशीनिमित्त विविध कार्यक्रम घेण्यात आले.

Pavadal inverted Pandhari | पुसदमध्ये अवतरली पंढरी

पुसदमध्ये अवतरली पंढरी

Next
ठळक मुद्देआषाढी एकादशी : विठ्ठल मंदिरात मांदियाळी

लोकमत न्यूज नेटवर्क
पुसद : आषाढी एकादशीनिमित्त शुक्रवारी शहरात अवघी पंढरी अवतरली होती. येथील विठ्ठल मंदिरात वैष्णवांचा मेळा भरला होता. विठुनामाच्या गजराने शहर भारावून गेले होते.
विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात आषाढी एकादशीनिमित्त विविध कार्यक्रम घेण्यात आले. या मंदिरात शहरातील भाविकांनी विठ्ठल दर्शनासाठी गर्दी केली होती. लांबच लांब रांगा लागल्या होत्या. जुन्या वस्तीतील ज्ञानेश्वर संस्थानच्या विठ्ठल मंदिरात विविध कार्यक्रम घेण्यात आले. पहाटे ४ वाजता पंचामृताने विठुरायाचा महाभिषेक करण्यात आला. ६ वाजता महाआरती तर ७ वाजता ज्ञानेश्वरीचे सामूयिक पारायण झाले. ८.३० वाजतापासून सायंकाळपर्यंत भजन व भक्तिगीतांचा कार्यक्रम झाला.
ज्ञानेश्वर मंदिर संस्थानतर्फे यानिमित्त रक्तदान शिबिर घेण्यात आले. तसेच नागरिकांकडून देहदानाचे संकल्प पत्र भरून घेण्यासाठी स्टॉल लावण्यात आले. झाडे लावा-झाडे जगवा, बेटी बचाओ-बेटी पढाओ, करा योग-रहा निरोग, पाणी अडवा-पाणी जिरवा आदींचे फलक लावून भाविकांमध्ये जनजागृती करण्यात आली. भाविकांची मोफत चहापाण्याची व्यवस्था करण्यात आली. या सोहळ्यानिमित्त बसस्थानक-गुजरी चौक ते परत बसस्थानकापर्यंत भाविकांना मोफत वाहनांची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. दिव्यांग भाविकांसाठी व्हील चेअर उपलब्ध करून देण्यात आल्या. त्यांना थेट दर्शनाचा लाभ देण्यात आला. कार्यक्रमासाठी ११०० सेवाधारी, मंदिर प्रशासनाचे कर्मचारी तैनात होते. पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

Web Title: Pavadal inverted Pandhari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.