मेडिकलमध्ये रुग्ण ‘आॅन’लाईन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2018 10:23 PM2018-01-10T22:23:32+5:302018-01-10T22:23:54+5:30

Patients' Aan'line in medical | मेडिकलमध्ये रुग्ण ‘आॅन’लाईन

मेडिकलमध्ये रुग्ण ‘आॅन’लाईन

googlenewsNext
ठळक मुद्देरुग्णांचे हाल : एकाच खिडकीने उपचार मिळणे कठीण, नाव नोंदणीसाठी रांगा

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आलेल्या रुग्णांना उपचारापूर्वी तासंतास केवळ नोंदणीसाठी उभे रहावे लागते. डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर विविध चाचण्यांसाठी आॅनलाईन सक्ती आणि त्यासाठी असलेल्या एकाच खिडकीमुळे बुधवारी प्रचंड मोठी रांग दिसून आली. त्यामुळे अनेकांना नोंदणी करता आली नाही. परिणामी उपचारही मिळाले नाही.
येथील वसंतराव नाईक शासकीय महाविद्यालयात दर दिवसाला १२०० ते १४०० रुग्ण बाह्य विभागात उपचारासाठी दाखल होतात. यासाठी येथे सर्वप्रथम नोंदणी करावी लागते. सुरुवातीला कागदावरच नोंदणी केली जाते. त्यानंतर संबंधित रुग्ण डॉक्टरांकडे जाऊन तपासणी करतात. मात्र याठिकाणी डॉक्टरांनी सांगितलेल्या विविध चाचण्यासाठी आॅनलाईन नोंदणी करावी लागते. या नोंदणीसाठी केवळ एकच खिडकी आहे. त्यामुळे येथे लांबच लांब रांग दिसून येते. ही नोंदणी प्रक्रिया दुपारी १२ वाजेपर्यंत सुरु राहते. त्यानंतर नोंदणी होत नसल्याने उपचाराची शक्यता कमी असते. बाह्यरुग्ण विभागात डॉक्टर दुपारी १ वाजेपर्यंत राहतात. या आॅनलाईन सक्तीमुळे संपूर्ण संपूर्ण वेळ रांगेतच जातो. त्यामुळे उपचार होत नाही. विशेष म्हणजे मंगळवारी असणारे डॉक्टर बुधवारी नसतात. नियमानुसार त्यांचा दिवस शुक्रवारचा असतो. त्यामुळे रुग्णाना पुन्हा शुक्रवारी यावे लागते. अशा स्थितीत गंभीर रुग्णांच्या नातेवाईकांची परडत होते अनेकजण तर तीन-तीन दिवस रांगेत लागून पोहचत नसल्याच्या तक्रारी आहेत. बुधवारी येथील वैद्यकीय महाविद्यालयात ४०० ते ५०० रुग्णांची रांग लागली होती. आधीच आजाराने ग्रस्त रूग्ण या रांगेत उभे राहून चांगलेच वैतागले आहे.
बाह्यरुग्ण विभागाची वेळ वाढविण्याची गरज
यवतमाळ जिल्ह्याचा विस्तार मोठा आहे. त्यामुळे उमरखेड अथवा वणी येथून येणारा रुग्ण मेडीकलमध्ये सकाळी ११ वाजेपर्यंत पोहचते. त्यामुळे त्याच्यावर उपचार होणे कठीण जाते. आता तर रक्त तपासणी, एक्स-रे व इतर तपासण्यांसाठी प्रथम आॅन लाईन नोंदणी करावी लागते. त्यामुळे येथे असलेल्या खिडक्यांची संख्या वाढविण्यासोबतच बाह्यरुग्ण विभागाची वेळ वाढविण्याची गरज निर्माण झाली आहे.

Web Title: Patients' Aan'line in medical

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.