यवतमाळ जिल्ह्यातील महागावात तीन अपघातात एक ठार, दोन जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2017 01:32 PM2017-11-14T13:32:43+5:302017-11-14T13:34:17+5:30

यवतमाळ तालुक्यात झालेल्या तीन वेगवेगळया अपघातात एकजण ठार तर दोन जण गंभीर जखमी झाल्याच्या घटना येथे घडल्या.

One killed and two injured in three accidents in Yawatmal district | यवतमाळ जिल्ह्यातील महागावात तीन अपघातात एक ठार, दोन जखमी

यवतमाळ जिल्ह्यातील महागावात तीन अपघातात एक ठार, दोन जखमी

Next
ठळक मुद्देउस भरलेली ट्रॉली उलटलीदुसऱ्या अपघातात कार ट्रॅक्टरवर आदळली

आॅनलाईन लोकमत
यवतमाळ
यवतमाळ तालुक्यात झालेल्या तीन वेगवेगळया अपघातात एकजण ठार तर दोन जण गंभीर जखमी झाल्याच्या घटना येथे घडल्या.
सुमितसिंग अजयसिंग ठाकूर (२८)रा. अमरावती हा आपला मित्र जितेंद्र ओंकारसिंग ठाकूर (३१) याच्यासोबत उमरखेड तालुक्यातील निंगनूर येथे जात होता. सोमवारी रात्री १० च्या सुमारास फुलसावंगीजवळ गतीरोधकावर त्याची दुचाकी उसळून झालेल्या अपघातात सुमितसिंग हा जागीच ठार झाला. दुसरा अपघात उमरखेड-महागाव मार्गावर मंगळवारी सकाळी घडला. यात टो करून नेत असलेली कार उभ्या असलेल्या ट्रॅक्टरवर धडकली. त्यात बंटी इंगळे (१९) हा तरुण जखमी झाला. तो कार चालवीत होता. त्याला नांदेड येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तिसरा अपघात महागाव शहरातील जुन्या बसस्थानकासमोर घडला. सोमवारी रात्री उसाच्या ट्रकाची ट्रॉली येथे उलटली. यात कुठलीही जिवीतहानी झाली नाही.

Web Title: One killed and two injured in three accidents in Yawatmal district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Accidentअपघात