आता जिल्ह्यातील अंगणवाड्याही होताहेत डिजिटल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2017 10:46 PM2017-11-20T22:46:21+5:302017-11-20T22:46:41+5:30

Now digital anganwadis are also digital | आता जिल्ह्यातील अंगणवाड्याही होताहेत डिजिटल

आता जिल्ह्यातील अंगणवाड्याही होताहेत डिजिटल

Next
ठळक मुद्देडिजिटल प्रेरणा : कलगाव येथे जिल्ह्यातील पहिल्या अंगणवाडीचे उद्घाटन

आॅनलाईन लोकमत
दिग्रस : राष्ट्रीय शिक्षक दिनाचे औचित्य साधून तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या कलगाव येथे डिजीटल अंगणवाडीचे उद्घाटन पार पडले. जिल्ह्यातील पहिल्या खासगी डिजीटल अंगणवाडीस मिळाला आहे. राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक आमीन चौहान यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
जिल्ह्यातील शाळा डिजीटल व्हाव्या यासाठी दिग्रस तालुक्याने पुढाकार घेतला आहे. शिक्षक, लोकसहभाग आणि शासकीय अनुदानातून जिल्ह्यात ४६७ शाळा डीजिटल झाल्या आहेत. आता त्याचे लोण अंगणवाडीपर्यंत पोहोचत आहे. कलगावच्या खासगी अंगणवाडीसह एका सरकारी अंगणवाडीचा यात समावेश आहे. या अंगणवाडीत सध्या टीव्ही आणि अ‍ॅन्ड्राईड मोबाईलचा वापर केला जात आहे. टीव्हीवर मुलांना आवडणारी गाणी, गोष्टी दाखविल्या जात आहे. मुलांना शिकविताना त्यांना आवडणाºया कार्टुनचा भरपूर वापर केला जात असल्याचे अंगणवाडीच्या संचालिका इसा शेख यांनी सांगितले.
या कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष अब्दूल गफ्फार, सचिव शेख मुबीन, सरपंच वहिदाबी अब्दूल गफ्फार, उपसरपंच डॉ. रामेश्वर राऊत, कुद्रूस खान, माजी सरपंच इसाक शेख, डॉ. नामदेव काळबांडे, मुख्याध्यापक महंमद परसुवाले, सय्यद गफ्फार, महंमद एजाज, मुजीब शेख, नम्रता चिरडे, जावेद शेख, आमीन शेख, जमीर खान, सय्यद शबीर उपस्थित होते.
यावेळी अंगणवाडीच्या चिमुकल्यांनी विविध शैक्षणिक कलाकृती दाखवून उपस्थितांची मने जिंकली. संचालन जुनेद खान यांनी तर आभार फारुक अहमद यांनी मानले.

Web Title: Now digital anganwadis are also digital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.