‘मेडिकल’चे डॉक्टर मेळघाटमध्ये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2018 09:54 PM2018-02-11T21:54:26+5:302018-02-11T21:54:54+5:30

येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टरांचे पथक अमरावती जिल्ह्यातील मेळघाट या दुर्गम भागात वैद्यकीय सेवा देण्यासाठी रवाना झाले आहे.

 Medical doctor's doctor in Melghat | ‘मेडिकल’चे डॉक्टर मेळघाटमध्ये

‘मेडिकल’चे डॉक्टर मेळघाटमध्ये

Next
ठळक मुद्देआरोग्य तपासणी : डॉक्टरांसह ६० जणांचे पथक रवाना

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टरांचे पथक अमरावती जिल्ह्यातील मेळघाट या दुर्गम भागात वैद्यकीय सेवा देण्यासाठी रवाना झाले आहे. या चमूमध्ये डॉक्टर व तंत्रज्ञानसह ६० जणांचा समावेश आहे. या शिबिरासाठी महाविद्यालय प्रशासनाने पुढाकार घेतला असून तेथील गंभीर रुग्णांवर यवतमाळात उपचार केले जाणार आहे.
मेळघाटातील अतिदुर्गम भागात असलेल्या हतरू या प्राथमिक आरोग्य केंद्रात आदिवासींसाठी महाआरोग्य तपासणी शिबिर आयोजित केले आहे. या शिबिरात सेवा देण्यासाठी यवतमाळ मेडिकलमधील डॉक्टरांची चमू पाठविण्यात आली आहे. यात औषधोपचार, शल्यचिकित्सा, नाक-कान-घसा, नेत्ररोग, स्त्रीरोग, अस्थिव्यंगोपचार विभागातील काही प्रमुख डॉक्टर तसेच तंत्रज्ञ येथे उपचारासाठी शनिवारी सायंकाळी रवाना झाले. संपूर्ण दिवसभर या महाआरोग्य शिबिरात आलेल्या रुग्णांची तपासणी करून त्यांना पुढील उपचारासाठी यवतमाळात आणले जाणार आहे. रविवार हा सुट्टीचा दिवस व बाह्यरुग्ण तपासणी बंद असल्याने रुग्णालय अधीष्ठाता डॉ.मनीष श्रीगिरीवार यांनी पुढाकार घेत आरोग्यसेवेपासून वंचित असलेल्या मेळघाटातील आदिवासी बांधवांकरिता शिबिराचे आयोजन केले. या शिबिरापूर्वी तेथे आरोग्य तपासणी करून शिबिरासाठी रुग्णांचे स्क्रिनिंग करण्यात आले. शिबिरात अधिक उपचाराची आवश्यकता असलेल्या रुग्णांना यवतमाळात आणून त्यांच्यावर उपचार करण्यात येणार आहे. यवतमाळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची चमू अशा शिबिरासाठी पहिल्यांदाच मेळघाटात जात असून या ठिकाणी आढळलेल्या रुग्णांना ते यवतमाळात आणून उपचार करणार आहे.

Web Title:  Medical doctor's doctor in Melghat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.