मातोश्री वीणादेवी दर्डा स्मृतिदिनी विविध कार्यक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2018 10:29 PM2018-07-16T22:29:56+5:302018-07-16T22:30:16+5:30

मातोश्री वीणादेवी दर्डा यांच्या सहाव्या स्मृतिदिनानिमित्त गुरुवार, १९ जुलै रोजी आदरांजली सभा, शैक्षणिक साहित्य वितरण आणि भजन व भावगीत कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

Matoshree Veena Devi Darda Memorial Day | मातोश्री वीणादेवी दर्डा स्मृतिदिनी विविध कार्यक्रम

मातोश्री वीणादेवी दर्डा स्मृतिदिनी विविध कार्यक्रम

Next
ठळक मुद्देगुरूवार १९ जुलै : आदरांजली सभा, शैक्षणिक साहित्य वितरण, भजन व भावगीत

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : मातोश्री वीणादेवी दर्डा यांच्या सहाव्या स्मृतिदिनानिमित्त गुरुवार, १९ जुलै रोजी आदरांजली सभा, शैक्षणिक साहित्य वितरण आणि भजन व भावगीत कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
स्वातंत्र्य संग्राम सेनानी तथा लोकमतचे संस्थापक संपादक जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या सहचारिणी मातोश्री वीणादेवी दर्डा यांच्या स्मृतिदिनानिमित्त गुरुवार, १९ जुलै रोजी सकाळी ९.३० ते १०.३० या वेळात आदरांजली सभेचे आयोजन येथील प्रेरणास्थळ येथील मातोश्री वीणादेवी दर्डा यांच्या समाधीस्थळी करण्यात आले आहे. त्यानंतर सकाळी ११ वाजता नगरपरिषद शाळांमधील वर्ग १ ते ५ च्या सर्व एक हजार २०० विद्यार्थ्यांना जवाहरलाल दर्डा फाऊंडेशनच्यावतीने शैक्षणिक साहित्याचे वितरण केले जाणार आहे. मातोश्री दर्डा सभागृहात आयोजित या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लोकमत एडिटोरियल बोर्डचे चेअरमन माजी खासदार विजय दर्डा राहणार आहे. प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष माधुरीताई आडे, यवतमाळच्या नगराध्यक्ष कांचनताई चौधरी, जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जलज शर्मा, जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राज कुमार, नगरपरिषद शिक्षण सभापती नीता केळापुरे, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अनिल अढागळे, प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ.सुचिता पाटेकर, नगरपरिषद शिक्षण विभागाचे प्रशासन अधिकारी योगेश डाफ उपस्थित राहणार आहे.
त्याच दिवशी सायंकाळी ५.३० ते ७.३० या वेळात मातोश्री दर्डा सभागृहात वीणादेवी दर्डा यांच्या स्मृतिदिनानिमित्त भजन व भावगीताचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात अमोलकचंद महाविद्यालयाचे संगीत विभाग प्रमुख तथा प्रसिद्ध गायक प्रा.डॉ.राहुल एकबोटे आणि त्यांचा संच गीत गायन करतील. या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन जवाहरलाल दर्डा फाऊंडेशन व लोकमत परिवाराच्यावतीने करण्यात आले आहे.

Web Title: Matoshree Veena Devi Darda Memorial Day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.