शारदे, वीणा ठेव दूर आता, शस्त्र घे तू हाती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2019 09:31 PM2019-01-13T21:31:12+5:302019-01-13T21:33:55+5:30

सारस्वतांना विचार करण्यास भाग पाडणारी ही कविता हुकूमशाहीत सांस्कृतिक चळवळ दडपणाऱ्यांचा निषेध करणारी होती. नयनतारा सहगल यांना येण्यापासून रोखल्याने प्रवीण दवणे यांनी ही घणाघाती कविता रविवारी सकाळी संमेलनात सादर केली.

Marathi Sahitya Samelan; Kavi Samelan | शारदे, वीणा ठेव दूर आता, शस्त्र घे तू हाती

शारदे, वीणा ठेव दूर आता, शस्त्र घे तू हाती

Next
ठळक मुद्देमान्यवरांचे कविसंमेलन आंदोलकांचा निषेध करत, सारस्वतांवरही शरसंधान

रूपेश उत्तरवार
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ (राष्ट्रसंत तुकडोजी महाराज साहित्यनगरी) :

टोपणाने बंद केले लेखणीला,
दिन अच्छे आ गये है झाकणाला
रे खुले आकाश आहे
कैद केले अंतरंगाच्या चांदणीला
पिंजऱ्याच्या आतच घे भरारी
राजहंसी चेहऱ्याची ती गिधाडे
गाय ही आपसूकच आली दावणीला
लोकशाहीच्या मुळात धुंडतो
मी निघालो उत्सवाला शारदेच्या
पोहचलो पन लष्कराच्या छावणीला
शारदे ठेव वीणा दूर आता,
शस्त्र घे तू हाती, तूच हो दुर्गा
सारस्वतांना विचार करण्यास भाग पाडणारी ही कविता हुकूमशाहीत सांस्कृतिक चळवळ दडपणाऱ्यांचा निषेध करणारी होती. नयनतारा सहगल यांना येण्यापासून रोखल्याने प्रवीण दवणे यांनी ही घणाघाती कविता रविवारी सकाळी संमेलनात सादर केली. आंदोलकांना आणि निमंत्रण रद्द करणाऱ्यांचा कवितेमधून खरपूस समाचार घेतला.
अजीम नवाज राही यांनी ‘शब्दांची दौलत’ ही कविता सादर केली.
शब्दाची दौलत जपतांना
व्यवहार कधी निसटला
हे कळलेच नाही.
आता गावाच्या नकाशात
घरच नाही.

बबन सराडकर यांनी
‘चोचीला चारा कुठला, हे कोणी विचारत नाही
गगनाला वैभव भिडले लखलाभ तुमचे तुम्हाला
करपले पीक यंदा ही नुसत्या दिशा उरल्या
हंगाम कशाचा करता हे कुनी विचारत नाही ’
या कवितेमधून शेतकऱ्यांची व्यथा मांडली. तुकाराम धांडे यांनी ‘राण’ नावाच्या कवितेमध्ये दऱ्या खोऱ्यातील मानवी जीवन व्यक्त केले. अशोक नायगावकर यांनी शासनाच्या दुर्लक्षित धोरणाने झालेली उलथापालथ मांडली. मुबारक शेख यांनी ‘जगाचा पोशिंदा पोट मारून जगतो , ढेरपोट्यांना अजीर्ण व्हावे’ ही कविता सादर केली.
अरूण म्हात्रे यांनी
जसे स्वप्न पडले
तसा चालतो मी,
जेथे प्रेम म्हणते
तिथे थांबतो मी
या कवितेवर टाळ्या घेतल्या. या कविसंमेलनाचे बहारदार संचालनही अरूण म्हात्रे यांनीच केले.

Web Title: Marathi Sahitya Samelan; Kavi Samelan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.