साहित्यिकांनी अगत्याने येऊन आपले म्हणणे मांडावे, यवतमाळ जिल्हावासीयांचे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2019 05:48 PM2019-01-09T17:48:41+5:302019-01-09T17:51:22+5:30

यवतमाळ जिल्ह्याला ४५ वर्षानंतर साहित्य संमेलनाच्या आयोजनाचा बहुमान मिळाला. संमेलनाच्या उद्घाटकाचे निमंत्रण रद्द करणे ही अतिशय दुर्दैवी घटना येथे घडली.

Let the writers come forward and make their say, Yavatmal district residents appealed | साहित्यिकांनी अगत्याने येऊन आपले म्हणणे मांडावे, यवतमाळ जिल्हावासीयांचे आवाहन

साहित्यिकांनी अगत्याने येऊन आपले म्हणणे मांडावे, यवतमाळ जिल्हावासीयांचे आवाहन

Next

यवतमाळ - जिल्ह्याला ४५ वर्षानंतर साहित्य संमेलनाच्या आयोजनाचा बहुमान मिळाला. संमेलनाच्या उद्घाटकाचे निमंत्रण रद्द करणे ही अतिशय दुर्दैवी घटना येथे घडली. मात्र यवतमाळकरांच्या अस्मितेला ठेच पोहोचल्यानंतरही हे संमेलन यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी सर्वजण एकत्र आलो आहोत. साहित्यिकांनीही त्यांच्या भावना, विचार संमेलनात सहभागी होऊन व्यक्त कराव्या, अशी भूमिका यवतमाळकर जनतेच्यावतीने आयोजित पत्रपरिषदेत मांडण्यात आली. 

अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या आयोजनासाठी समितीचे कार्याध्यक्ष डॉ. रमाकांत कोलते व त्यांच्या सहकार्यांनी अनेक वर्षांपासून प्रयत्न केले. महत प्रयासानंतर यवतमाळकरांना साहित्य संमेलनाचे यजमान पद भूषविण्याची संधी मिळाली. जिल्ह्याला समृद्ध अशी साहित्यिकांची परंपरा लाभली आहे. त्यातच संमेलन यवतमाळात होणार याचा अत्यानंद सर्वांनाच झाला. संमेलनाच्या आयोजनासाठी समितीनेही कठोर परिश्रम घेतले. त्यानंतर मुख्य उद्घाटक नयनतारा सहगल यांना दिलेले निमंत्रण ऐनवेळी रद्द झाले. या दुर्दैवी घटनेनंतर अनेक घडामोडी सातत्याने होत आहेत. अशा स्थितीत अनेक साहित्यिकांनी संमेलनावर बहिष्कार टाकण्याचीच घोषणा केली आहे. मात्र यवतमाळकर नागरिक या नात्याने साहित्य संमेलनाशी प्रत्येकाची अस्मिता जुळल्या गेली आहे. जे झाले ते वाईट झाले आता संमेलन मात्र यशस्वीरीत्या पार पडायला हवे. साहित्यिकांनीही त्यांच्या भावना येथे येऊन व्यक्त कराव्या, असे आवाहन यवतमाळकरांच्यावतीने करण्यात आले. मराठी साहित्याने कूस बदलली ंआहे.

पहिल्यांदाच संमेलनाच्या अध्यक्ष व उद्घाटक या दोन्हीही महिलाच होत्या. आता महिला अध्यक्ष असणेही भूषणवाहबाब आहे.  यवतमाळात येणारा मराठी साहित्यिक  हा पाहुणा नसून आमचं गणगोत आहे या भावनेतून त्यांचे स्वागत केले जाईल, अशी भूमिका पत्रपरिषदेतून मांडली. यावेळी माजी आमदार दिवाकर पांडे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रवीण देशमुख, डॉ. विजय कालवकर, डॉ.टी.सी. राठोड, अ‍ॅड. जयसिंह चव्हाण, साहित्यिक आनंद गायकवाड, अशोक बोबडे, नानाभाऊ गाडबैले, जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष  मनीष पाटील, सुरेश राठी, जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष अ‍ॅड. मिनाज मलनस, शिवसेना जिल्हा प्रमुख राजेंद्र गायकवाड, प्रा. डॉ. नितीन खर्चे, जिल्हा बँकेचे संचालक बाबूपाटील वानखडे, विद्या खडसे, नगरसेवक वैशाली सवाई, दिनेश गोगरकर, सुरेश चिंचोळकर आदी उपस्थित होते.

Web Title: Let the writers come forward and make their say, Yavatmal district residents appealed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.