पाणीटंचाईत जेएन पार्कने ठेवला नवा आदर्श

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2018 09:58 PM2018-06-14T21:58:50+5:302018-06-14T21:58:50+5:30

यवतमाळ शहरात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली. संपूर्ण शहरात पाण्यासाठी हाहाकार उडाला. मात्र याच शहरातील जेएन पार्कमध्ये मात्र दररोज वसाहतीतील बोअरवेलवरून दोन तास पाणी येते. पाणीटंचाईतही मुबलक पाण्याची किमया साधली ती या परिसरातील नागरिकांच्या एकोप्याने.

JN Park kept the ideal of water scarcity | पाणीटंचाईत जेएन पार्कने ठेवला नवा आदर्श

पाणीटंचाईत जेएन पार्कने ठेवला नवा आदर्श

Next
ठळक मुद्देनागरिकांचा एकोपा : टंचाई काळात बोअरवेलवरून संपूर्ण नगराला पाणी

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : यवतमाळ शहरात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली. संपूर्ण शहरात पाण्यासाठी हाहाकार उडाला. मात्र याच शहरातील जेएन पार्कमध्ये मात्र दररोज वसाहतीतील बोअरवेलवरून दोन तास पाणी येते. पाणीटंचाईतही मुबलक पाण्याची किमया साधली ती या परिसरातील नागरिकांच्या एकोप्याने. आजही शहरात पाण्यासाठी वणवण भटकंती सुरू असताना जेएन पार्कमध्ये मात्र मुबलक पाणी नागरिकांना मिळत आहे.
यवतमाळ-दारव्हा मार्गावर जेएन पार्क आहे. या भागातील नागरिकांचा एकोपा वाखाणण्याजोगा आहे. विशेष म्हणजे पाण्याच्या बाबतीत हा परिसर आत्मनिर्भर झाला आहे. पाणीपुरवठ्यासाठी या नगरात एक बोअरवेल खोदण्यात आली होती. नागरिकांनी बोअरवेलला लागून मोठमोठ्ठाले शोषखड्डे तयार केले. त्यामुळे पुनर्भरण झाले. परिणामी भीषण पाणीटंचाईतही येथील बोअरवेलला मुबलक पाणी आहे. दररोज दोन तास या बोअरवेलचे पाणी सोडल्या जाते.
गेल्या कित्येक वर्षांपासून यात कधी खंड पडला नाही. विशेष म्हणजे या परिसरात स्वतंत्र पाणीपुरवठा योजना नागरिकांनीच तयार केल्याने कुणी प्राधिकरणाचे नळही घेतले नाही. यंदाच्या उन्हाळ्यात कुणालाही पाणी विकत घेण्याची वेळ आली नाही.
जेएन पार्कमध्ये पाणी वितरणासाठी एक समिती तयार करण्यात आली आहे. समितीचे अध्यक्ष उत्तम अजमिरे, सचिव उत्तम राठोड, उपाध्यक्ष दिलीप मेश्राम, विनोद डवले, युवराज राठोड, श्रीकृष्ण हिंगासपुरे, सुधीर राऊत, विजय बकाले, मोहन शहाडे, अनिल यावूल, कैलास भगत काम पाहतात.
आपल्या परिसराला तर पाणी दिले जाते. परंतु लगतच्या पोलीस मित्र सोसायटी आणि इतर वसाहतींनाही येथील पाण्याचा टंचाईच्या काळात आधार झाला.
पाण्याची टाकी द्या
या भागात थेट पाणीपुरवठा होतो. त्याऐवजी याठिकाणी पाण्याची टाकी उभारल्यास नागरिकांना अधिक दाबाने पाणी मिळेल, वीज वाचेल यासाठी येथे पाण्याची टाकी द्यावी, अशी मागणी उत्तम अजमिरे यांनी केले. तर स्वाती डुकरे, वंदना डवले यांनी या भागात रेन वॉटर हार्वेस्टींग करण्याची गरज असल्याचे सांगितले.

Web Title: JN Park kept the ideal of water scarcity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.