दारव्ह्यात दीड कोटींच्या तुरीची अवैध विक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2018 11:37 PM2018-10-13T23:37:17+5:302018-10-13T23:38:02+5:30

येथील शासकीय तूर खरेदी केंद्रावर १४९ शेतकऱ्यांच्या नावाने दोन हजार ६०२ क्विंटल तुरीची अवैध विक्री करण्यात आली. यात शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी सहा जणांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

Illegal sale of 1.5 crore rupees in the market | दारव्ह्यात दीड कोटींच्या तुरीची अवैध विक्री

दारव्ह्यात दीड कोटींच्या तुरीची अवैध विक्री

Next
ठळक मुद्देसहा जणांविरूद्ध गुन्हा : १४९ शेतकऱ्यांची फसवणूक

लोकमत न्यूज नेटवर्क
दारव्हा : येथील शासकीय तूर खरेदी केंद्रावर १४९ शेतकऱ्यांच्या नावाने दोन हजार ६०२ क्विंटल तुरीची अवैध विक्री करण्यात आली. यात शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी सहा जणांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
येथील शासकीय तूर खरेदी केंद्रावर १४९ शेतकºयांच्या नावे तब्बल एक कोटी ४१ लाख ८२ हजार ८६३ रुपयांची तूर अवैधरित्या विकण्यात आली. अमित मलनस, हरिभाऊ गुल्हाने, धर्मेंद्र ढोले, रंजित राठोड, महेश भोयर व मडसे असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपींचे नाव आहेत. त्यांच्यावर १४९ शेतकºयांची दोन हजार ६०२ क्विंटल तूर अवैधरित्या विकून शासनाची फसवणूक केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. याप्रकरणी जिल्हा उपनिबंधक कार्यालयातील सहायक निबंधक (प्रशासन) अर्चना माळवे यांनी पोलीस ठाण्यात या सहा जणांविरूद्ध तक्रार दिली होती. त्यावरून त्यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
दारव्हा येथील सहायक निबंधकांनी जिल्हा उपनिबंधकांकडे तुरीच्या अवैध विक्रीचा अहवाल पाठविला होता. नाफेडमार्फत येथील कृषी उत्पन्न बाजार समितीतील केंद्रावर तुरीची खरेदी करण्यात आली होती. या खरेदीचा चौकशी अहवाल जिल्हा उपनिबंधकांकडे गेल्यानंतर त्यांनी मार्केटिंग फेडरेशनच्या अधिकाऱ्यांना याबाबत माहिती दिली. या तूर खरेदीमध्ये शासनाची फसवणूक झाल्यामुळे संबंधितांविरूद्ध फौजदारी कारवाई करण्याचे मार्केटिंग फेडरेशनला सूचित केले होते. शनिवारी दाखल तक्रारीत अमित मलनस यांनी ४८ शेतकऱ्यांच्या नावे ९९५ क्विंटल, हरिभाऊ गुल्हाने यांनी ५५ शेतकऱ्यांच्या नावे ७४५ क्विंटल, धर्मेंद्र ढोले याने १७ शेतकऱ्यांच्या नावे २८२ क्विंटल, रंजित राठोडने सहा शेतकऱ्यांच्या नावे १०६ क्विंटल, महेश भोयरने दहा शेतकऱ्यांच्या नावे २३३ क्विंटल, तर मडसे याने १३ शेतकऱ्यांच्या नावे २४० क्विंटल तूर अवैधरित्या विक्री करून शासनाची फसवणूक केल्याचा आरोप केला होता. त्यानुसार सहा जणांविरूद्ध फसवणुकीचे गुन्हे दाखल झाल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे.

Web Title: Illegal sale of 1.5 crore rupees in the market

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.