महामार्गासाठी २२ लाखांच्या गौण खनिजाचे अवैध उत्खनन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2018 10:31 PM2018-05-16T22:31:58+5:302018-05-16T22:31:58+5:30

दिग्रस ते कारंजा या ७०० कोटींचे बजेट असलेल्या राष्ट्रीय महामार्गाच्या बांधकामासाठी चक्क २२ लाखांच्या गौण खनिजाचे अवैधरीत्या उत्खनन केले गेल्याचा खळबळजनक प्रकार तलाठ्याच्या स्पॉट पंचनाम्याने उघडकीस आला आहे.

Illegal excavation of 22 million mineral minerals for the highway | महामार्गासाठी २२ लाखांच्या गौण खनिजाचे अवैध उत्खनन

महामार्गासाठी २२ लाखांच्या गौण खनिजाचे अवैध उत्खनन

Next
ठळक मुद्देस्पॉट पंचनामा : तलाठ्याचा अहवाल, आता प्रतीक्षा कारवाईची

लोकमत न्यूज नेटवर्क
दारव्हा : दिग्रस ते कारंजा या ७०० कोटींचे बजेट असलेल्या राष्ट्रीय महामार्गाच्या बांधकामासाठी चक्क २२ लाखांच्या गौण खनिजाचे अवैधरीत्या उत्खनन केले गेल्याचा खळबळजनक प्रकार तलाठ्याच्या स्पॉट पंचनाम्याने उघडकीस आला आहे. या प्रकरणात आता तहसीलदार पाचपट दंड व फौजदारी कारवाई करतात काय याकडे तालुक्यातील जनतेचे लक्ष लागले आहे.
दिग्रस-दारव्हा-कारंजा या राष्ट्रीय महामार्गाचे बांधकाम सुरु आहे. त्यासाठी महसूल खात्याच्या साक्षीने कंत्राटदाराकडून सर्रास उल्लंघन केले जात आहे. ‘लोकमत’ने हा प्रकार उघडकीस आणल्यानंतर दारव्हा तहसीलदारांनी चौकशीचे आदेश दिले होते. तालुक्याच्या बागबाडी येथे सदर कंत्राटदाराला जिल्हाधिकाऱ्यांनी तीन हजार ब्रास तर तहसीलदारांनी ५०० ब्रास गौण खनिज उत्खननाची परवानगी दिली होती. परंतु तलाठ्याने स्थळ पंचनामा केला असता गट क्र. ९१/२ मध्ये नऊ हजार ब्रास गौण खनिजाचे उत्खनन झाल्याचे मोजणीत आढळून आले. परवानाव्यतिरिक्त पाच हजार ५०० ब्रास गौण खनिजाचे अवैधरीत्या उत्खनन केले गेल्याचे ११ मे २०१८ रोजी सादर अहवालात म्हटले आहे. प्रति ब्रास ४०० रुपये प्रमाणे सुमारे २२ लाख रुपयांचे गौण खनिज विनापरवाना उत्खनन करण्यात आले आहे. नियमानुसार पाचपट दंडाची तर संबंधित वाहनावर प्रत्येकी एक लाख रुपये दंडाची आणि संबंधितांवर फौजदारी कारवाईची तरतूद आहे. तलाठ्यांच्या या अहवालावर दारव्हा तहसीलदार आता काय कारवाई करतात, हे पाहणे महत्वाचे ठरते.
दारव्ह्याचा महसूल विभाग सदर कंत्राटदारासाठी बघ्याची भूमिका घेत असल्याची ओरड ऐकायला मिळते आहे. त्यानंतरही राजकीय स्तरावरून काहीच ‘हाक ना बोंब’ असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
गाळ उपसल्याने धरणाच्या क्षेत्रात मोठे खड्डे
सदर कंत्राटदाराने तालुक्यातील शिंदी धरणातसुद्धा गाळ उपसण्याच्या निमित्ताने मोठमोठ्ठे धोकादायक खड्डे केले आहेत. वास्तविक जिल्हा प्रशासनाने या धरणाच्या भिंतीपासून २०० मीटर अंतर सोडून गाळ नेण्याचे व कोणत्याही परिस्थितीत खड्डे होणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचना शेतकºयांना केल्या होत्या. धरणाचा गाळ उपसला जाईल व जमीनही सूपिक होईल, असा प्रामाणिक उद्देश प्रशासनाचा या मागे होता. परंतु महामार्गाच्या कंत्राटदाराने प्रशासनाच्या या आवाहनाचा आपल्या पद्धतीने सोईस्कर अर्थ लावून धरणातील गाळाची २०० मीटर क्षेत्रात आणि त्यातही मोठमोठ्ठे खड्डे पाडून उत्खनन केल्याचा गंभीर प्रकार पुढे आला आहे. या खड्ड्यांमुळे भविष्यात धरणाला धोका होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. हे खड्डेसुद्धा महसूल व सिंचन प्रशासनासाठी आव्हान ठरले आहे.

Web Title: Illegal excavation of 22 million mineral minerals for the highway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.