गुजरात, बिहारचे विद्यार्थी आत्महत्याग्रस्त गावात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2018 10:11 PM2018-01-07T22:11:56+5:302018-01-07T22:13:07+5:30

जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्यांवर अनेकांनी अनेक निष्कर्ष काढल्यावर आता विविध राज्यातील विद्यार्थ्यांनीही अभ्यास सुरू केला आहे. ज्येष्ठ पत्रकार आणि रमन मॅगसेसे पुरस्कार विजेते पी. साईनाथ यांच्या मार्गदर्शनात पत्रकारितेचे शिक्षण घेणाºया या विद्यार्थ्यांनी शनिवार आणि रविवार ....

Gujarat, Bihar students commit suicide | गुजरात, बिहारचे विद्यार्थी आत्महत्याग्रस्त गावात

गुजरात, बिहारचे विद्यार्थी आत्महत्याग्रस्त गावात

Next
ठळक मुद्देशेलू, दाभडीला भेट : शिक्षण, आरोग्य, सामाजिक कुप्रथांचेही नोंदविले निरीक्षण

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्यांवर अनेकांनी अनेक निष्कर्ष काढल्यावर आता विविध राज्यातील विद्यार्थ्यांनीही अभ्यास सुरू केला आहे. ज्येष्ठ पत्रकार आणि रमन मॅगसेसे पुरस्कार विजेते पी. साईनाथ यांच्या मार्गदर्शनात पत्रकारितेचे शिक्षण घेणाºया या विद्यार्थ्यांनी शनिवार आणि रविवार असा दोन दिवस जिल्ह्यात दौरा करून विविध निरीक्षणे नोंदविली.
चेन्नई येथील एशियन कॉलेज आॅफ जर्नालिझमचे २५ विद्यार्थी आणि त्यांचे तीन शिक्षक सध्या यवतमाळ दौºयावर आहेत. हे विद्यार्थी तमीळनाडूसह बिहार, गुजरात, आसाम, दिल्ली, हरियाणा, आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेशातील मूळ रहिवासी आहेत. शनिवारी त्यांनी आर्णी तालुक्यातील शेलू गावाला भेट देऊन तेथील शेतकºयांशी संवाद साधला, तर रविवारी दाभडी गावाला भेट दिली.
त्यानंतर यवतमाळ येथे स्थानिक पत्रकारांशी चर्चा करताना जिल्ह्यातील परिस्थिती पाहून धक्का बसल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. जिल्ह्यातील खेड्यांमध्ये शासनाने शौचालय बांधण्याची मोहीमच उघडली आहे. परंतु, गावांमध्ये पिण्यासाठीच पाणी नाही तर ते शौचालयात जादा पाणी कसे वापरतील? हा प्रश्न या चमूतील विद्यार्थिनींनी उपस्थित केला. येथे शिक्षणासाठी गावा-गावांमध्ये शाळा आहेत. मात्र, मुले आईवडिलांना मदत म्हणून मजुरी करायला जातात, ही परिस्थिती त्यांना भयावह वाटली. यवतमाळ जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात सिंचन प्रकल्प असूनही सिंचनाचे प्रमाण अत्यल्प आहे. कसेबसे पीक काढल्यावर शेतमालाला भाव मिळत नाही, असे असतानाही स्थानिक पत्रकार त्याविरुद्ध आवाज का उठवित नाही, असा प्रश्नही विद्यार्थ्यांनी उपस्थित केला.
शेतकरी कितीही गरीब असला तरी मुलीच्या लग्नात त्याला हुंडा द्यावाच लागतो, महिला शेतमजुराला पुरुष मजुरापेक्षा कमी मजुरी मिळते, आरोग्य केंद्रांमध्ये डॉक्टरच नसतात हे विदारक चित्र विद्यार्थ्यांनी नोंदवून घेतले. शेतकºयांची परिस्थिती एवढी हलाखीची आहे, तर खेड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात दुचाकी वाहनांची संख्या का दिसते? शेतकऱ्यांना ही वाहने वापरणे परवडते तरी कसे? असा प्रश्नही त्यांना पडला. पीककर्ज मिळविताना अनेक अडचणी असल्या तरी वाहनकर्ज देण्यासाठी कंपन्या शेतकऱ्यांना सवलती देतात, हे ऐकून त्यांना आश्चर्य वाटले. मक्ता, बटईने शेती करणारा शेतकरी कोणत्याही शासकीय मदतीला पात्र ठरत नाही, पैसेवारी ५० पैशांच्या खाली आली म्हणजे नेमके काय झाले, खासगी सावकारांकडूनच शेतकरी कर्ज का घेतात अशा विविध गोष्टी त्यांनी समजावून घेतल्या. यावेळी शेतकरी न्यायहक्क आंदोलन समितीचे निमंत्रक देवानंद पवार उपस्थित होते.
कुणाकडेच माती आरोग्यपत्रिका नाही
शेलू गावात विचारपूस केली असता एकाही शेतकऱ्याकडे सॉईल हेल्थ कार्ड नव्हते. मग या शेतकºयांनी पेरणी कशाच्या भरवशावर केली? असा प्रश्न परराज्यातून आलेल्या या विद्यार्थ्यांना पडला. शेतीचे प्रशिक्षण कुणीच घेत नाही, सेंद्रीय शेती कळते पण कुणीच का करीत नाही, असे प्रश्न घेऊन हे विद्यार्थी दाभडी गावातही फिरले. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ज्या गावात येऊन स्वामिनाथन आयोग लागू करण्याचे आश्वासन दिले, तेथील शेतकरी सुखी आहेत का, याचा अभ्यास केल्यावर विद्यार्थी निराशच झाले.

Web Title: Gujarat, Bihar students commit suicide

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.