गुणवंत शाळेला देणार १० लाखांचे बक्षीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2019 10:16 PM2019-06-14T22:16:49+5:302019-06-14T22:16:58+5:30

नगरपालिकेची शाळा म्हणजे शिक्षणाच्या दुरवस्थेचा विद्रूप चेहराच, असा समज झाला आहे. मात्र यवतमाळ शहरातील शाळांना उर्जितावस्था प्राप्त करून देण्यासाठी नगरपालिकेने आगळेवेगळे पाऊल उचलले आहे. गुणवत्तापूर्ण शिक्षणात सरस ठरणाऱ्या शाळेला १० लाखांचे घसघशीत बक्षीस जाहीर करण्यात आले आहे.

Giving 10 lakh prize to school | गुणवंत शाळेला देणार १० लाखांचे बक्षीस

गुणवंत शाळेला देणार १० लाखांचे बक्षीस

Next
ठळक मुद्देयवतमाळ नगरपालिकेचा निर्णय : मूल्यांकनासाठी पाच सदस्यीय समिती गठित

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : नगरपालिकेची शाळा म्हणजे शिक्षणाच्या दुरवस्थेचा विद्रूप चेहराच, असा समज झाला आहे. मात्र यवतमाळ शहरातील शाळांना उर्जितावस्था प्राप्त करून देण्यासाठी नगरपालिकेने आगळेवेगळे पाऊल उचलले आहे. गुणवत्तापूर्ण शिक्षणात सरस ठरणाऱ्या शाळेला १० लाखांचे घसघशीत बक्षीस जाहीर करण्यात आले आहे.
नगराध्यक्ष कांचन चौधरी यांनी याबाबत सर्व मुख्याध्यापकांची बैठक घेऊन त्यांना सविस्तर माहिती दिली. शहरातील एकूण तीन शाळांना बक्षिसे दिली जाणार आहेत. त्यात पहिले बक्षीस १० लाखांचे, दुसरे ७ लाखांचे तर तिसरे बक्षीस ५ लाखांचे दिले जाणार आहे. यामुळे नगरपालिकेच्या शाळांमध्ये स्पर्धा निर्माण होऊन गुणवत्ता वाढावी, असा उद्देश आहे. गुणवत्तेसाठी शाळांना तब्बल २२ लाखांचे पुरस्कार देणारी यवतमाळ ही राज्यातील पहिलीच नगरपालिका ठरणार आहे. नगराध्यक्ष कांचन चौधरी यांच्या संकल्पनेतून हा ‘गुणवत्तापूर्ण सर्वांग सुंदर शाळा’ उपक्रम पुढे आला, तर त्यासाठी प्रशासन अधिकारी योगेश डाफ यांनी पुढाकार घेतला.
मात्र हे पुरस्कार पटकावण्यासाठी नगरपालिका शाळांना अनेक निकष पूर्ण करावे लागणार आहेत. गुरुवारी नगराध्यक्ष कांचन चौधरी, शिक्षण सभापती अ‍ॅड. करूणा तेलंग, मुख्याधिकारी अनिल अढागळे, प्रशासन अधिकारी योगेश डाफ यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या बैठकीत निवड समिती गठित करण्यात आली. त्यात अध्यक्ष म्हणून पद्माकर मलकापुरे, सदस्य म्हणून अविनाश शिर्के, प्रशांत गावंडे, सुप्रभा यादगीरवार, उत्तमराव भोयर आदींचा समावेश आहे. ही समिती नगरपालिकेच्या शाळांना भेटी देऊन गुणवत्तापूर्ण सर्वांग सुंदर शाळा निवडणार आहे. या समितीला मुख्याध्यापकांनी सहकार्य करण्याचे आवाहन मुख्याधिकारी अनिल अढागळे यांनी केले.

Web Title: Giving 10 lakh prize to school

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.