गॅरेज-टू-गॅरेज गुटख्याची तस्करी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 7, 2017 11:27 PM2017-10-07T23:27:56+5:302017-10-07T23:28:06+5:30

पोलीस व अन्न-औषधी प्रशासनाची नजर चुकविण्यासाठी गुटखा तस्करीत नवनवीन फंडे वापरले जात आहेत. असाच एक फंडा पुढे आला आहे.

 Garage-to-garage gutkha | गॅरेज-टू-गॅरेज गुटख्याची तस्करी

गॅरेज-टू-गॅरेज गुटख्याची तस्करी

Next
ठळक मुद्देनवा फंडा : पोलीस-एफडीएपुढे आव्हान, मुख्यालय यवतमाळात

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : पोलीस व अन्न-औषधी प्रशासनाची नजर चुकविण्यासाठी गुटखा तस्करीत नवनवीन फंडे वापरले जात आहेत. असाच एक फंडा पुढे आला आहे. त्यात थेट ट्रान्सपोर्टिंग करणाºया गॅरेज-टू-गॅरेज गुटखा तस्करी केली जात असल्याची माहिती आहे.
गुटखा तस्करीच्या या नव्या फंड्याची संपूर्ण सूत्रे यवतमाळातून हलविली जातात. पूर्वी गुटखा तस्करी करणाºया या व्यावसायिकाने आता सुका मेव्याचा व्यवसाय थाटला आहे. पोलीस व अन्न औषधी प्रशासनाला ‘आम्ही ट्रॅक बदलविला’ हे दाखविण्यासाठी सुकामेवा व्यवसायाचे प्रदर्शन केले जात आहे. परंतु प्रत्यक्षात त्याआड गुटखा तस्करीची सूत्रे हलविली जात आहे. वास्तविक हा गुटखा या दुकानापर्यंत थेट कधीच येत नाही. गॅरेजवरुनच गुटख्याची ही तस्करी चालविली जाते.
सूत्रानुसार, या गुटख्याचे गोदाम मध्यप्रदेशातील शिवणी येथे आहे. गुटखा निर्मिती करणाºया कंपन्यांकडून हा प्रतिबंधित गुटखा खरेदी केला जातो. तो शिवणीमध्ये साठविला जातो. तेथून तो डाकेद्वारे नागपुरात उतरविला जातो. तेथूनच ट्रान्सपोर्ट गॅरेजमधून यवतमाळात येतो. येथून तो किराणा व अन्य मालाच्या आड ४०७ व अन्य छोट्या वाहनातून करंजी, उमरी, घाटंजी, आर्णी, दिग्रस व अन्य ठिकाणी पाठविला जात असल्याची माहिती आहे. व्यावसायिकांच्या मागणीनुसारच या गुटख्याच्या डाक नागपुरात तयार केल्या जातात. त्या डाक तशाच्या तशा गॅरेज-टू-गॅरेज संबंधितांकडे पाठविल्या जातात.
पोलिसांनी या गुटखा तस्करावर सतत तीन महिने पाळत ठेवली. मात्र त्यांच्या हाती काहीच लागले नाही. पोलीस आपल्या मागावर असल्याचे कळताच त्या व्यावसायिकाने तीन महिने शांत राहणे पसंत केले. मात्र साहेब बदलताच सुकामेव्याआड पुन्हा तस्करी सुरू झाली. मध्यप्रदेशातून नागपूर मार्गे यवतमाळात होणारी ही गुटखा तस्करी सिद्ध करणे, पकडणे कठीण आहे. म्हणून हा गुटखा तस्कर व्यावसायिक स्थानिक पोलिसांनाही जुमानत नसल्याचे सांगितले जाते. कारवाईचे अधिकार असलेल्या शासनाच्या दुसºया एजंसीला मात्र हा तस्कर अधूनमधून ‘खूश’ करीत असल्याचे बोलले जाते.
‘डिटेक्शन’मध्ये एक्सपर्ट स्थानिक पोलिसांसाठी गॅरेज-टू-गॅरेज चालणाºया या गुटखा तस्करीचा पर्दाफाश करण्याचे आव्हान आहे. अनेकदा ट्रान्सपोर्ट व्यावसायिकांना अंधारात ठेऊनही ही गुटखा तस्करी केली जाते. मध्यप्रदेश व आंध्रप्रदेशातून येणाºया या प्रतिबंधित गुटख्याचा संपूर्ण जिल्ह्यातच धुमाकूळ सुरू आहे. हा धुमाकूळ पोलीस व अन्न-औषधी प्रशासनासाठी खुले आव्हान ठरला आहे.

कंपनीतून माल शिवणी गोदामात, नागपूरात होतेय पॅकींग
मध्यप्रदेशातील शिवणीतून नागपूर मार्गे निघालेला हा प्रतिबंधित गुटखा सुखरुप यवतमाळ व येथून गावखेड्यापर्यंत पोहोचतो. यातच एफडीए आणि पोलिसांचे खरे अपयश लपलेले आहेत. न्यायालयाच्या निर्णयानुसार आम्हाला कारवाईचे अधिकार नाहीत, असे सांगून पोलीस सर्रास हात वर करताना दिसतात. एफडीएला हे अधिकार असले तरी त्यांच्यात इच्छाशक्ती दिसून येत नाही. सोबतीला मनुष्यबळाच्या टंचाईचे कारण आहेच. त्याचाच आडोसा घेऊन गुटख्याआड या दोनही यंत्रणा हात ओले करीत आहेत.

Web Title:  Garage-to-garage gutkha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.