शेतकरी व कृषिशास्त्रज्ञ आमने-सामने

By admin | Published: August 4, 2015 02:29 AM2015-08-04T02:29:59+5:302015-08-04T02:29:59+5:30

पुस्तकी ज्ञानाचा आधार घेत कृषिशास्त्रज्ञ सोयाबीनवर एलो मोझॅक तर परंपरागत ज्ञानाच्या अनुभवावर शेतकरी खोड

Farmers and agronomists face-to-face | शेतकरी व कृषिशास्त्रज्ञ आमने-सामने

शेतकरी व कृषिशास्त्रज्ञ आमने-सामने

Next

कलेक्टरकडे धाव : एलो मोझॅक की खोड कीड?
यवतमाळ : पुस्तकी ज्ञानाचा आधार घेत कृषिशास्त्रज्ञ सोयाबीनवर एलो मोझॅक तर परंपरागत ज्ञानाच्या अनुभवावर शेतकरी खोड कीड असल्याचे सांगत आहे. शेतकरी आणि कृषी शास्त्रज्ञ आमने-सामने उभे ठाकले असून कुणीही कुणाचे ऐकायला तयार नाही. परिणामी शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव घेत त्यांच्यापुढे पिवळे पडलेले सोयाबीनचे झाडच सादर केले. आता हा नेमका प्रकार काय आहे आणि त्यावर कोणत्या उपाययोजना सूचविल्या जाणार याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
अपुऱ्या पावसाने आधीच सोयाबीनची वाढ खुंटली आहे. आॅगस्ट महिन्यात सोयाबीन फुलोऱ्यावर येतो. परंतु यावर्षी सोयाबीन हिरवे दिसत आहे. त्यातच या सोयाबीनवर आता रोगाचे आक्रमण झाले आहे. शेतातील सोयाबीन पिवळे पडत आहे. शेतकऱ्यांनी याबाबत कृषी शास्त्रज्ञांंना मार्गदर्शन मागविले. त्यावरून येथील पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी या सोयाबीनची पाहणी केली. त्यावरून सोयाबीनवर एलो मोझॅक आल्याचे सांगितले. कृषी विज्ञान केंद्राने एक पत्रक काढून एलो मोझॅक नियंत्रणासाठी उपाययोजना सूचविल्या. शेतकऱ्यांनी कृषी विज्ञान केंद्राच्या सूचनांचे पालन करीत शेतात फवारणी केली. मात्र त्यानंतरही सोयाबीनवर कोणताच फरक पडला नाही.
दरम्यान, शेतकऱ्यांना सोयाबीनवरील रोग एलो मोझॅक नसून खोड कीड असल्याचे लक्षात आले. हा प्रकार त्यांनी कृषी विभागाला सांगितला. मात्र कृषी विभाग शेतकऱ्यांचे ऐकायला तयार नाही. कृषिशास्त्रज्ञांनी दिले तेच शंभर टक्के खरे असे सांगत आहे. यामुळे कृषी शास्त्रज्ञ आणि शेतकरी एक प्रकारे आमने-सामनेच आले. कृषी विभाग ऐकायला तयार नसल्याने महागाव तालुक्यातील काही शेतकरी सोमवारी थेट जिल्हा कचेरीत धडकले. त्यांनी जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांची भेट घेऊन सोयाबीनचे झाड दाखविले. झाड आतून कशा प्रकारे पोखरले आहे आणि या प्रकाराला खोड कीड म्हणतात, असे सांगितले. तसेच कृषी विज्ञान केंद्रावर असलेली जबाबदारी काढून घेण्याची मागणी केली. कारण आजपर्यंत या कृषी विज्ञान केंद्राने शेतकऱ्यांंना योग्य मार्गदर्शन केले नसल्याचा थेट आरोप करण्यात आला.
यावेळी महागाव तालुक्यातील प्रगतीशील शेतकरी अमृतराव देशमुख, आशिष जाधव, अमोल बघाटे, सुनील पतंगराव, दादाराव ठाकरे, देवीदास पावडे, श्रीकांत ठाकरे, नंदू हेडे, भाऊराव पावडे, किशोर उन्हाळे आदी शेतकरी उपस्थित होते. (शहर वार्ताहर)

शेतावर प्रत्यक्ष पाहणी करून घोळ
४डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विज्ञान केंद्राच्या शास्त्रज्ञांनी महागाव तालुक्यातील सोयाबीनच्या शेतांची पाहणी केली होती. या पाहणीवरूनच त्यांनी एलो मोझॅक असल्याचे सांगितले. मात्र त्यावेळीही शेतकऱ्यांनी आक्षेप होता.

४जिल्हाधिकारी कार्यालयात शेतकरी पोहोचल्यानंतर त्या ठिकाणी कृषी शास्त्रज्ञ आणि शेतकऱ्यांमध्ये चांगलीच खडाजंगी झाल्याची माहिती आहे. दोघेही आपल्या मुद्यावर ठाम होते. त्यामुळे आता सोयाबीनवर नेमका कोणता रोग आला आहे, याची माहिती जाणून घेण्यासाठी डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या संशोधन संचालकांना पत्र लिहून तज्ज्ञ पाठविण्याचे निर्देश कृषी अधीक्षकांना दिले आहे.

Web Title: Farmers and agronomists face-to-face

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.