‘ड्रगलॅन्ड’च्या स्फोटाने हादरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2017 09:55 PM2017-12-13T21:55:59+5:302017-12-13T21:56:27+5:30

मुंगोली खुल्या कोळसा खाणीत कोळशाच्या उत्खननासाठी अजस्त्र अशा ड्रगलॅन्ड मशीनचा होत असलेला वापर शेतकऱ्यांच्या मुळावर उठला आहे. या मशीनद्वारे होणाºया स्फोटाने मोठ-मोठे दगड परिसरातील शेतात येऊन पडत असल्याने शेतात काम करणाऱ्या शेतकरी, शेतमजुरांचे जीव धोक्यात आले आहेत.

The explosion of 'dragon' blasts | ‘ड्रगलॅन्ड’च्या स्फोटाने हादरे

‘ड्रगलॅन्ड’च्या स्फोटाने हादरे

Next

शेतकऱ्यांचे नुकसान : कापूस काळवंडला, तुरीचा बहार गळाला
लोकमत न्यूज नेटवर्क
वणी : मुंगोली खुल्या कोळसा खाणीत कोळशाच्या उत्खननासाठी अजस्त्र अशा ड्रगलॅन्ड मशीनचा होत असलेला वापर शेतकऱ्यांच्या मुळावर उठला आहे. या मशीनद्वारे होणाºया स्फोटाने मोठ-मोठे दगड परिसरातील शेतात येऊन पडत असल्याने शेतात काम करणाऱ्या शेतकरी, शेतमजुरांचे जीव धोक्यात आले आहेत. एवढेच नव्हे तर स्फोटानंतर वातावरणात मोठ्या प्रमाणावर उडणारी धूळ परिसरातील शेतात उभ्या असलेल्या कपाशीला काळवंडून टाकत आहे. या स्फोटाने मुंगोली, शिवणीसह अनेक गावांना हादरे बसत आहेत. त्यामुळे गावकरी भयग्रस्त आहेत.
कोळसा खाणीत स्फोट करण्यासाठी अजस्त्र जमिनीचा पोतही बिघडत असल्याने भविष्यात या भागातील शेती अस्थिपंजर होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे शेती उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता आहे. या परिसरातील शेतांमध्ये सध्या तूर व कपाशीचे पीक उभे आहे. ड्रगलॅन्ड मशीनने स्फोट केल्यानंतर मोठ्या प्रमाणावर कोळशाची धूळ उडते. ती परिसरातील कपाशीचे पीक व तूर पिकावर बसते. त्यामुळे कापूस काळवंडत असून तुरीच्या बहराला गळती लागली आहे. यामुळे उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता आहे. याबाबत चौैकशी करण्याची मागणी परिसरातील शेतकºयांनी केली आहे.
सरपंचाची उपविभागीय अधिकाऱ्यांकडे तक्रार
यासंदर्भात मुंगोलीचे सरपंच रुपेश ठाकरे यांनी बुधवारी वणीच्या उपविभागीय अधिकाऱ्यांकडे तक्रार केली अनेकदा तक्रारी करूनही कोणतीच कारवाई होत नसल्याने शेतकऱ्यांनी आता कायदा हातात घ्यायचा का, असा संतप्त सवाल त्यांनी तक्रारीतून उपस्थित केला आहे. वेकोलिच्या मनमानी कारभाराला पायबंद घालून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी त्यांनी तक्रारीतून केली आहे.

Web Title: The explosion of 'dragon' blasts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :cottonकापूस