पूस नदी पुनरुज्जीवन अभियानाची सांगता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2018 09:54 PM2018-06-12T21:54:10+5:302018-06-12T21:54:10+5:30

शहराची जीवनदायी असलेल्या पूस नदी पुनरुज्जीवन अभियानाच्या पहिल्या टप्प्याची सांगता सोमवारी येथील पूस नदी तीरावरील टिळक पुतळा परिसरात करण्यात आली. ४० दिवस या अभियानाच्या माध्यमातून पुसदकरांनी श्रमदान करून एक लोकचळवळ उभारली होती.

Explanation of Pus River Revival Campaign | पूस नदी पुनरुज्जीवन अभियानाची सांगता

पूस नदी पुनरुज्जीवन अभियानाची सांगता

Next
ठळक मुद्दे पहिला टप्पा : ४० दिवस अविरत श्रमदान, पुसदमध्ये लोकचळवळ

लोकमत न्यूज नेटवर्क
पुसद : शहराची जीवनदायी असलेल्या पूस नदी पुनरुज्जीवन अभियानाच्या पहिल्या टप्प्याची सांगता सोमवारी येथील पूस नदी तीरावरील टिळक पुतळा परिसरात करण्यात आली. ४० दिवस या अभियानाच्या माध्यमातून पुसदकरांनी श्रमदान करून एक लोकचळवळ उभारली होती.
नाम फाऊंडेशन आणि पूस नदी पुनरुज्जीवन अभियानाच्या माध्यमातून २ मेपासून पूस नदी स्वच्छता अभियानाला प्रारंभ झाला होता. या कार्यासाठी नाम फाऊंडेशनने दोन पोकलॅन्ड मशीन उपलब्ध करून दिल्या. त्यानंतर त्यासाठी दररोज लागणाऱ्या ३५ हजार रुपयांच्या डिझेल खर्चाची जबाबदारी पुसद शहरातील सामाजिक, शैक्षणिक संस्था, शासकीय कार्यालये, पतसंस्था, बँका आणि नागरिकांनी स्वीकारली. रोजच्या रोज लोकप्रतिनिधीतून निधीची जुळवाजुळव करीत पूस नदी पुनरुज्जीवन समितीने ४० दिवसात या अभियानाला गती दिली. पुसद-नागपूर रस्त्यावरील मोठ्या पुलापासून ते टिळक पुतळ्यापर्यंतचा परिसर स्वच्छ करण्यात आला. नियोजनबद्ध करण्यात आलेल्या या कामात पुसदकर उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते.
पावसाळा सुरू झाल्यामुळे व सुरुवातीलाच जोरदार पाऊस झाल्याने पूस नदी भरुन वाहत आहे. पूस नदीला आलेला पूर पाहून श्रमदात्यांना मनातून आनंद झाला. हेच या कार्याचे यश होय. नाम फाऊंडेशनची यवतमाळ जिल्ह्यातील सर्व कामे १ जूनलाच बंदी झाली असताना पूस नदी पुनरुज्जीवन समिती व पुसदकरांचा उत्साह पाहून दहा दिवस जास्त मशीन उपलब्ध करून दिली. हा नामचा सकारात्मक प्रतिसाद पुसदकरांसाठी महत्वाचा ठरला आहे. समारोपीय कार्यक्रमात पोकलॅन्ड मशीन चालकांचा सत्कार करण्यात आला. यावेळी नामचे समन्वयक स्वप्नील देशमुख उपस्थित होते.
पूस नदी पुनरुज्जीवन समितीचे अभिजित चिद्दरवार, डॉ. मोहंमद नदीम, अभय गडम, डॉ. राजेश पाचकोर, सतीश भुसाळे, अ‍ॅड. विवेक टेहरे, अजय क्षीरसागर, शशांक गावंडे, पवन बोजेवार, मोहन बोजेवार, मोहन चव्हाण, मारोती भस्मे, आनंददीप जांगीड, सचिन भिताडे, गोपाल सुरोशे, अमर आसेगावकर, प्रा.स्वाती वाठ, मधुकर चव्हाण, प्रा. विलास भवरे यांच्यासह पुसद शहरातील नागरिक यावेळी उपस्थित होते.

Web Title: Explanation of Pus River Revival Campaign

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :riverनदी