पाण्याच्या शोधात आलेल्या बिबट्याचा विहिरीत बुडून मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2018 11:54 PM2018-05-12T23:54:12+5:302018-05-12T23:54:12+5:30

पाण्याच्या शोधात तालुक्यातील नरसापूर शिवारातील महादेव मंदिराच्या विहिरीत पडलेल्या बिबट्याला वाचण्यिात बचाव पथक अपयशी ठरले. पथक उशिरा पोहचणे, एकमेकांत ताळमेळ नसणे, योग्य साधने व तांत्रिक ज्ञानाच्या अभावामुळे बिबट्याला वाचविता आले नाही, असा उपस्थितांचा सूर होता.

The drowning of the leopard came in search of water | पाण्याच्या शोधात आलेल्या बिबट्याचा विहिरीत बुडून मृत्यू

पाण्याच्या शोधात आलेल्या बिबट्याचा विहिरीत बुडून मृत्यू

Next
ठळक मुद्देनरसापूरची घटना : जीव वाचविण्यात वनखात्याला अपयश

लोकमत न्यूज नेटवर्क
कळंब : पाण्याच्या शोधात तालुक्यातील नरसापूर शिवारातील महादेव मंदिराच्या विहिरीत पडलेल्या बिबट्याला वाचण्यिात बचाव पथक अपयशी ठरले. पथक उशिरा पोहचणे, एकमेकांत ताळमेळ नसणे, योग्य साधने व तांत्रिक ज्ञानाच्या अभावामुळे बिबट्याला वाचविता आले नाही, असा उपस्थितांचा सूर होता.
मृत बिबट हा नर होता. त्याचे वय अंदाजे एक वर्षाच्या आसपास होते. शनिवारी सकाळी श्रमदानासाठी जंगलात गेलेल्या नागरिकांना हा बिबट विहिरीत पडून असल्याचे लक्षात आले. त्यांनी लगेच वन विभागाच्या अधिकाऱ्यांना माहिती दिली. मात्र आपत्ती व्यवस्थापन विभागाचे बचाव पथक तब्बल तीन तासाने उशिरा पोहोचले. तत्पूर्वी वनविभागाचे चार डझनाच्यावर अधिकारी घटनास्थळी दाखल झाले होते. मात्र बिबटाला बाहेर काढण्यासाठी त्यांच्याजवळ कुठलेही साधन नव्हते. बचाव पथकाचे प्रमुखही घटनास्थळी दाखल झाले, तेव्हा त्यांच्याजवळही कोणतेच साधन नव्हते. यानंतर वनविभागाचे बचाव पथक सर्व साधने घेऊन तेथे पोहोचले. तथापि एका लाकडाच्या आधारावर जिवंत असणारा बिबट बचाव पथकाचे आॅपरेशन सुरु झाल्यानंतर काही क्षणातच गटांगळ्या खाऊ लागला आणि अवघ्या पाच मिनिटातच तो पाण्याच्या तळाशी गेला. नंतर त्याला बाहेर काढून पंपींग करुन वाचविण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र हा प्रयत्न अपयशी ठरला.
तीव्र पाणीटंचाईमुळे जंनलातील वन्यप्राणी गावाकडे धाव घेत आहे. सदर बिबटही पाण्याच्या शोधातच विहिरीत पडला होता. यावेळी सहायक वनसंरक्षक आर.व्ही.गोपाल, उपविभागीय वन अधिकारी बी.पी.राठोड, वनपरिक्षेत्र अधिकारी सी.एस.गावंडे, मोबाईल स्कॉडचे वनपरिक्षेत्र अधिकारी नाल्हे, नितीन वानखडे, ठाणेदार बी.जी. कऱ्हाळे यांच्या नेतृत्वात वन व पोलिसांचा फौजफाटा उपस्थित होता.
चुकीच्या प्रयत्नामुळे मृत्यू
हा बिबट एका लाकडी फाट्याच्या आधारावर विहिरीत तग धरून होता. विहीर केवळ १२ ते १४ फूट खोल होती. त्यामुळे विहिरीत शिडी अथवा एखादे झाड तोडून टाकल्यास बिबट त्याच्या आधारे बाहेर येऊ शकतो, अशी माहिती गावकरी वनविभागच्या रेस्क्यू टिमला देत होत. मात्र रेस्क्यू टिम लाकडाचा झुला करुन त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न करीत होती. शेवटी रेस्क्यू आॅपरेशन चुकीच्या पद्धतीने झाल्याने व गावकऱ्यांचे म्हणणे न ऐकल्याने बिबटाचा मृत्यू झाला. अधिकाऱ्यांनी स्थानिकांचा सल्ला मानला असता तर ही वेळ निश्चितच आली नसती. परंतु आपलीच ‘गिनो’ म्हणणाऱ्या एका अतिउत्साही अधिकाऱ्यामुळे बिबटाला जीव गमवावा लागला. त्यामुळे अनेकांनी नाराजी व्यक्त केली.

Web Title: The drowning of the leopard came in search of water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.