टॉवर उभारणीमुळे शेताची नासाडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2018 12:09 AM2018-05-16T00:09:09+5:302018-05-16T00:09:09+5:30

वरोरावरून तेलंगाणात जाणाऱ्या कर्नल ट्रान्समीशन टॉवर लाईनचे काम जोरात सुरू आहे. या टॉवर लाईनमध्ये शेतकºयांचे प्रचंड नुकसान होत आहे. संबंधित शेतकऱ्यांना मोबदला द्यावा, अशी मागणी मनसेने एसडीओंना दिलेल्या निवेदनातून केली आहे.

Destruction of field due to tower construction | टॉवर उभारणीमुळे शेताची नासाडी

टॉवर उभारणीमुळे शेताची नासाडी

Next
ठळक मुद्देमनसेचे निवेदन : शेतकऱ्यांना शासकीय दराने नुकसान भरपाई देण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क
वणी : वरोरावरून तेलंगाणात जाणाऱ्या कर्नल ट्रान्समीशन टॉवर लाईनचे काम जोरात सुरू आहे. या टॉवर लाईनमध्ये शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होत आहे. संबंधित शेतकऱ्यांना मोबदला द्यावा, अशी मागणी मनसेने एसडीओंना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
या टॉवरलाईनमध्ये वणी तालुक्यातील १६ तर मारेगाव तालुक्यातील पाच गावांमधील शेतकऱ्यांची शेती बाधित झाली आहे. टॉवर लाईनमध्ये शेती गेल्याने शेतकऱ्यांना शेतात औत फिरविणेही कठीण होणार आहे. तसेच तारांच्या खालील जमिनसुद्धा नापीक होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना सात लाख रुपये प्रती टॉवरप्रमाणे मोबदला देण्यात यावा, अशी मागणी मनसेने निवेदनातून केली आहे. जोपर्यंत मोबदला देण्यात येणार नाही, तोपर्यंत टॉवर काम करू देणार नाही, असा ईशारा मनसेचे राज्य उपाध्यक्ष राजू उंबरकर यांनी दिला आहे. निवेदनावर संतोष रोगे, रमेश सोनुले, बंडू येसेकर, गोविंदराव थेरे धनंजय त्रिंबके, अजिद शेख, श्रीकांत सांबजवार आदींच्या स्वाक्षºया आहेत.

Web Title: Destruction of field due to tower construction

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Farmerशेतकरी