उमरखेडात आता मटका ‘क्लोज’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2019 10:31 PM2019-01-18T22:31:21+5:302019-01-18T22:33:52+5:30

मटका-जुगारात जाणकारांना ओपन आणि क्लोजचे महत्व माहीत असते. आतापर्यंत खुलेआमपणे (ओपन) शहरात सुरू असलेला वरळी मटका ‘लोकमत’मध्ये वृत्त प्रकाशित होताच शुक्रवारी ‘क्लोज’ झाला. मटका अड्डा चालक भूमिगत झाले असून त्यांचे चेलेचपाटे रस्त्याने फिरुन पट्टी गोळा करीत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

'Close' at Umarkhed | उमरखेडात आता मटका ‘क्लोज’

उमरखेडात आता मटका ‘क्लोज’

googlenewsNext
ठळक मुद्देकाऊंटर रिकामे : अड्डा चालक भूमिगत, फिरत्या पट्टीवर जोर

एकनाथ पवार।
लोकमत न्यूज नेटवर्क
उमरखेड : मटका-जुगारात जाणकारांना ओपन आणि क्लोजचे महत्व माहीत असते. आतापर्यंत खुलेआमपणे (ओपन) शहरात सुरू असलेला वरळी मटका ‘लोकमत’मध्ये वृत्त प्रकाशित होताच शुक्रवारी ‘क्लोज’ झाला. मटका अड्डा चालक भूमिगत झाले असून त्यांचे चेलेचपाटे रस्त्याने फिरुन पट्टी गोळा करीत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
शहरातील नाग चौक, बसस्थानक चौक, पुसद रोड, ढाणकी रोड अशा अनेक ठिकाणी खुलेआम मटका सुरू आहे. मटका अड्ड्यांवर खुलेआमपणे पट्टी फाडली जात आहे. सामान्य नागरिकांना हा प्रकार दररोज दृष्टीस पडतो. मात्र पोलिसांची दृष्टी अद्यापही या मटका अड्ड्यांवर पडली नाही. त्यामुळे संबंधित मटका अड्डा चालक व पोलीस यंत्रणेचे अर्थपूर्ण संबंध असल्याची चर्चा संपूर्ण शहरात सुरू आहे. याबाबत ‘लोकमत’ने शुक्रवारच्या अंकात उमरखेडमध्ये मटका झाला ओपन या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित केले. वृत्त प्रकाशित होताच शुक्रवारी सकाळपासून सर्व मटका अड्डे मनुष्यविरहित झाले. अनेक अड्ड्यांवर केवळ बाकडे, खुर्चा आणि टेबलच दिसून येत होते. मात्र मटका पट्टी घेणारे भूमिगत झाल्याचे चित्र दिसून आले. गुरुवारी पांढरकवडा येथे खुलेआम मटका जुगार सुरू असल्याचे शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी उघडकीस आणले होते. त्यानंतर सायंकाळी तातडीने तेथील ठाणेदाराची नियंत्रण कक्षात बदली झाली. तोच प्रकार उमरखेडमध्ये सुरू असतानासुद्धा वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी कारवाईची तसदी घेतली नाही. मात्र ‘लोकमत’ने हा प्रकार उघडकीस आणल्यामुळे अनेक महिलांनी ‘लोकमत’चे कौतुक केले. याच प्रमाणे शहरातील अवैध प्रवासी वाहतुकीवरसुद्धा प्रकाश टाकण्याची मागणी त्यांनी केली.
कारवाईकडे लक्ष
ंजिल्ह्यात पांढरकवडा ठाण्यात असाच प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलीस अधीक्षकांनी तातडीने दखल घेत कारवाई केली. मात्र येथील या प्रकाराकडे वरिष्ठांचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे स्थानिकचे पोलीस अधिकारी शिरजोर झाले आहे. अधीक्षक कोणती कारवाई करतात याकडे जनतेचे लक्ष लागले आहे.

Web Title: 'Close' at Umarkhed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.