९० लाखांच्या पुलाला पहिल्याच पावसात भगदाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 7, 2018 09:19 PM2018-06-07T21:19:00+5:302018-06-07T21:19:00+5:30

दारव्हा तालुक्यात वार्षिक निधीमधून केलेल्या कामठवाडा ते आमशेत या जिल्हा मार्गावरील ९० लाखांच्या पुलाला पहिल्याच पावसात भगदाड पडले. यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामाची गुणवत्ता उघडी पडली.

Break the bridges to the 90 lakh bridge in the first rain | ९० लाखांच्या पुलाला पहिल्याच पावसात भगदाड

९० लाखांच्या पुलाला पहिल्याच पावसात भगदाड

googlenewsNext
ठळक मुद्देदारव्हा उपविभाग : पूल, डांबरीकरणाचा दर्जा निकृष्ट, पोटकंत्राटदाराची झाली पोलखोल

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : दारव्हा तालुक्यात वार्षिक निधीमधून केलेल्या कामठवाडा ते आमशेत या जिल्हा मार्गावरील ९० लाखांच्या पुलाला पहिल्याच पावसात भगदाड पडले. यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामाची गुणवत्ता उघडी पडली.
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वार्षिक निधीतून दारव्हा तालुक्यात कामठवाडा ते वडगाव गाढवे या रस्त्यावरील रपट्यांवर पुलांचे बांधकाम करण्यात आले. निविदा प्रक्रियेनंतर यवतमाळच्या गुघाणे कंस्ट्रक्शन कंपनीला कंत्राट मिळाले. त्यांनी हे काम दारव्हा तालुक्यातील एका खासगी पोटकंत्राटदाराला दिले. त्याने या तांत्रिक कामाचे तुकडे पाडून लेबर काँट्रॅक्टरला दिले. एवढ्या मोठ्या प्रमाणात काम करणारी एजंसी सतत बदलत गेली, तसतसा कामाचा दर्जाही खालावला. बांधकाम विभागाची स्थानिक यंत्रणा केवळ देखरेखीपुरती मर्यादित झाली.
निकृष्ट कामामुळे चिकणी येथील पाझर तलावासमोरील पुलाचे काम पहिल्या पावसातच उघडे पडले. बुधवारी रात्री या परिसरात जोरदार पाऊस झाला. या पावसात पुलावर मोठा खड्डा पडला. पिचिंग व मुरुम न वापरल्याने आता येथे चक्क वाहन फसू शकेल, अशी स्थिती आहे. चार चाकी वाहन या पुलावरून जाऊ शकत नाही. यावरून पुलाच्या कामात मोठ्या प्रमाणात आर्थिक अपहार झाल्याची ओरड सुरू आहे.
सरपंच तक्रार करण्याच्या तयारीत
या कामासोबत १२०० मीटर डांबरीकरणही केले गेले. त्याचाही दर्जा सुमार असून गुणवत्ता नियंत्रण व दक्षता विभागाकडून या कामाचे नव्याने मूल्यमापन होण्याची आवश्यकता आहे. दारव्हा उपविभागातील इतरही अनेक कामे याच पद्धतीने केली जातात, अशी ओरड आहे. सखोल तपास झाल्यास गंभीर प्रकार उघडकीस येण्याची शक्यता आहे. दरम्यान, या निकृष्ट कामाबाबत परिसरातील काही सरपंचांनी कार्यकारी अभियंता व आपले सरकार पोर्टलवर तक्रार नोंदविण्याची तयारी सुरू केली आहे.

Web Title: Break the bridges to the 90 lakh bridge in the first rain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.