यवतमाळात भाजपा पदाधिकाऱ्याचा आरटीओ चौकात खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2018 11:09 AM2018-01-19T11:09:59+5:302018-01-19T11:11:16+5:30

येथील भाजपाच्या दलित आघाडी जिल्हा उपाध्यक्षाचा सावकारीच्या पैशाच्या वादातून निर्घृण खून करण्यात आला. ही खळबळजनक घटना गुरुवारी सकाळी ८ वाजताच्या सुमारास नागपूर रोड स्थित आरटीओ कार्यालयाच्या समोर घडली.

BJP office bearer murderd at RTO in Yavatmal | यवतमाळात भाजपा पदाधिकाऱ्याचा आरटीओ चौकात खून

यवतमाळात भाजपा पदाधिकाऱ्याचा आरटीओ चौकात खून

Next
ठळक मुद्देसावकारीच्या पैशाचा वाद दोन्ही मारेकऱ्यांना अटक

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : येथील भाजपाच्या दलित आघाडी जिल्हा उपाध्यक्षाचा सावकारीच्या पैशाच्या वादातून निर्घृण खून करण्यात आला. ही खळबळजनक घटना गुरुवारी सकाळी ८ वाजताच्या सुमारास नागपूर रोड स्थित आरटीओ कार्यालयाच्या समोर घडली. यातील मृतकाला यापूर्वी एका खुनाच्या घटनेत जन्मठेपेची शिक्षाही ठोठावण्यात आली आहे, हे विशेष. खुनाच्या या घटनेमुळे यवतमाळातील वाढती गुन्हेगारी पुन्हा एकदा चर्चेत आली.
रितेश उर्फ बल्ली विलास बावीस्कर (२५) रा. पाटीपुरा यवतमाळ असे यातील मृताचे नाव आहे. त्याची आई फुलाबाई बावीस्कर यांनी दिलेल्या तक्रारीवरून यवतमाळ शहर पोलिसांनी खुनाचा गुन्हा नोंदविला. घटनेनंतर अवघ्या दोन तासात पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने दोन्ही आरोपींना स्मशानभूमी परिसरातील इंदिरानगरातून अटक केली. नईम उर्फ टमाटर खान वल्द गुलाबनबी खान (३२) रा. अलकबीरनगर यवतमाळ व नंदलाल उर्फ बंटी लाला दयाप्रसाद जयस्वाल (२९) रा. विदर्भ हाऊसिंग सोसायटी यवतमाळ अशी आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रितेश उर्फ बल्ली याने आरोपीला व्याजाने पैसे दिले होते. या पैशासाठी तो सतत तगादा लावत होता. याच कारणावरून रात्री त्यांच्यात भांडण झाले. या भांडणाचा वचपा म्हणून रितेशच्या खुनाचा कट रचण्यात आला. रात्री ठरल्याप्रमाणे सकाळी त्याला आरटीओ कार्यालय परिसरात बोलविण्यात आले. तेथे येताच त्याच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला गेला. जीव वाचविण्यासाठी तो गोदामाच्या परिसरात आश्रयाला गेला असता तेथेही त्याच्यावर सशस्त्र हल्ला करण्यात आला. यात रितेश मृत्यूमुखी पडला. घटनेनंतर मारेकरी तेथून पसार झाले. त्यांना स्मशानभूमी परिसरातील इंदिरानगरातून अटक करण्यात आली.
रितेशकडून आरोपींनी ३० हजार रुपये उधार घेतले होते. त्यापेक्षा किती तरी रक्कम व्याजासह परत केली. मात्र आणखी पैशाचा तगादा रितेशकडून सुरू होता. शिवीगाळ, धमकी देणे असे प्रकारही केले जात होते. त्याच्याकडून पैशासाठी जीवाला धोका होण्याची भीती असल्याने आरोपींनी स्वत:च रितेशचा खून करण्याचा प्लॅन बनविला व तो अमलात आणल्याची माहिती पोलिसांनी दिली.
पोलीस अधीक्षक एम. राज कुमार यांच्या विशेष पथकातील सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत गिते, जमादार अजय डोळे, सय्यद साजीद, पोलीस कर्मचारी वासू साटोणे, प्रदीप नायकवाडे, योगेश डगवार, रुपेश पाली, चालक अजय ढोले आदींनी आरोपींच्या अटकेची कारवाई केली.

Web Title: BJP office bearer murderd at RTO in Yavatmal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.