‘एटीकेटी’मुळे अकरावीचे प्रवेश अडचणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2019 09:37 PM2019-06-09T21:37:06+5:302019-06-09T21:37:44+5:30

दहावीच्या परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना ‘एटीकेटी’ सवलत लागू झाली. त्यामुळे त्यांचा अकरावी प्रवेशाचा मार्ग सुकर झाला. मात्र या एटीकेटीमुळे नवीनच संकट निर्माण झाले. त्यांना सामावून घेण्याची क्षमताच महाविद्यालयांमध्ये नाही.

'ATKT' turns into eleventh entrance | ‘एटीकेटी’मुळे अकरावीचे प्रवेश अडचणीत

‘एटीकेटी’मुळे अकरावीचे प्रवेश अडचणीत

Next
ठळक मुद्देक्षमता ३१ हजारांची : प्रवेश द्यावा लागणार ३८ हजार विद्यार्थ्यांना, सात हजार जादा

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : दहावीच्या परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना ‘एटीकेटी’ सवलत लागू झाली. त्यामुळे त्यांचा अकरावी प्रवेशाचा मार्ग सुकर झाला. मात्र या एटीकेटीमुळे नवीनच संकट निर्माण झाले. त्यांना सामावून घेण्याची क्षमताच महाविद्यालयांमध्ये नाही. परिणामी यावर्षी अकरावी प्रवेशाचा तिढा वाढण्याची शक्यता आहे.
दहावीच्या परीक्षेत फेल होणाऱ्या विद्यार्थ्यांनाही आता पुढील वर्षात अकरावीला प्रवेश दिला जाणार आहे. मात्र त्यांना दहावीत राहिलेल्या विषयांची परीक्षाही द्यावी लागणार आहे. त्याकरिता त्यांना तीन परीक्षांचा ‘चान्स’ मिळणार आहे. यामुळे दहावीत अनुत्तीर्ण होणाºया विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टळणार आहे.
दोन विषय आणि ३५ गुणांची अट
दहावीत फेल विद्यार्थ्यांना एटीकेटीच्या माध्यमातून अकरावीत प्रवेश मिळेल. मात्र काही अटी आहे. त्यात केवळ दोन विषयात फेल होणाºया विद्यार्थ्यांनाच एटीकेटी सवलत लागू आहे. जादा विषयात फेल असेल, सवलत लागू नाही. विज्ञान शाखेत अकरावीत प्रवेश मिळवायचा असेल, तर विज्ञान आणि गणित विषयात ३५ गुण आवषक आहे. ३५ गुण नसतील, तर विज्ञान शाखेत प्रवेश मिळणार नाही. मात्र कला आणि कॉमर्स शाखेत प्रवेश मिळेल. यामुळे विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले तरी त्यांचे शिक्षण थांबणार नाही. महाविद्यालयांना त्यानुसार प्रवेश स्वीकारण्याचे आदेशही दिले आहे.
या विद्यार्थ्यांना तीन परीक्षांमध्ये उत्तीर्ण होण्याची संधी देण्यात आली आहे. त्यांना अकरावी अभ्यासासोबत दहावी परीक्षेचे विषय देता येणार आहे. तीन परीक्षेत उत्तीर्ण होणे गरजेचे आहे. तरच त्यांना अकरावीची परीक्षा देता येणार आहे.
दहावीत अनुत्तीर्ण होऊनही एटीकेटी लागू झाल्यामुळे आता अकरावी प्रवेशासाठी महाविद्यालयात मोठी गर्दी होणार आहे. क्षमतेपेक्षा जादा विद्यार्थी असल्याने त्यांना प्रवेश द्यायचा कसा, असा प्रश्न महाविद्यालयांपुढे निर्माण होणार आहे. महाविद्यालयांना आता वाढीव मंजुरी मिळवावी लागणार आहे.

१३ हजार विद्यार्थी नापास
शालेय शिक्षण विभागाच्या एटीकेटी निर्णयामुळे महाविद्यालये अडचणीत येणार आहे. जिल्ह्यामध्ये ११ वी प्रवेशाची क्षमता ३१ हजार विद्यार्थ्यांची आहे. यंदा दहावीत ३८ हजार ३२५ विद्यार्थी होते. त्यापेकी २५ हजार २३१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले, १३ हजार ५४ विद्यार्थी फेल झाले आहे.

एटीकेटीच्या माध्यमातून प्रवेशाकरिता अर्ज करणाºया पात्र विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार आहे. त्या दृष्टीने महाविद्यालय प्रवेश प्रक्रिया पार पाडेल. यानंतर उर्वरित विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी शिक्षण विभाग प्रवेश सूचवितो.
- चंद्रप्रकाश वाहने
सहाय्यक शिक्षण उपनिरीक्षक, यवतमाळ .

Web Title: 'ATKT' turns into eleventh entrance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.