इंटरनॅशनल क्रिकेट चॅम्पियनशिपसाठी विदर्भाच्या संघाचे नेतृत्व आदित्य भगतकडे 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2019 04:32 PM2019-01-15T16:32:18+5:302019-01-15T16:32:30+5:30

हैदराबाद येथे होणाऱ्या ३२ व्या राजीव गांधी अंडर १९ ते २०  वयोगटातील नॅशनल क्रिकेट चॅम्पियनशिपसाठी विदर्भाच्या संघाची निवड घोषित करण्यात आली

Aditya Bhagat, the leader of the Vidarbha team for the International Cricket Championship | इंटरनॅशनल क्रिकेट चॅम्पियनशिपसाठी विदर्भाच्या संघाचे नेतृत्व आदित्य भगतकडे 

इंटरनॅशनल क्रिकेट चॅम्पियनशिपसाठी विदर्भाच्या संघाचे नेतृत्व आदित्य भगतकडे 

googlenewsNext

यवतमाळ : हैदराबाद येथे होणाऱ्या ३२ व्या राजीव गांधी अंडर १९ ते २०  वयोगटातील नॅशनल क्रिकेट चॅम्पियनशिपसाठी विदर्भाच्या संघाची निवड घोषित करण्यात आली असून, त्या संघाचे नेतृत्व महागाव (जिल्हा यवतमाळ )  येथील मातोश्री विद्यालयाचा विद्यमान शाखेचा विद्यार्थी आदित्य संजय भगत यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. 

१७ ते १९ जानेवारी प्रयत्न होणाऱ्या २०/२०   इंटरनॅशनल क्रिकेट सामन्याचे आयोजन राजीव गांधी इंटरनॅशनल स्टेडियम विजयानंद क्रिकेट ग्राउंड हैदराबाद येथे करण्यात आले आहे. इंटरनॅशनल चॅम्पियनशिपसाठी होणाऱ्या खेळाच्या मैदानावर भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार अजरुद्दीन उपस्थित राहणार आहे. आदित्य भगत कर्णधार (विदर्भ क्रिकेट संघ ) सुरेश चव्हाण (उपकर्णधार) विक्रांत खंदारे (किपर) तुषार पवार, रुपेश गव्हाने, कृष्णा जाधव, रोषण जाधव, गणेश खुपसे, आदेश मिलमिले, सिद्धेश जाधव, जुबेर जब्बारखान, रोहित येणकर, निलेश पवार, अक्षय जाधव अशा चवदा खेळाडूंची निवड अमरजित कुमार जनरल सेक्रेटरी सीएफआय हरियाणा, सयद सादिक पाशा अध्यक्ष तामिळनाडू यांनी केली आहे. हा संघ राहुल भगत विदभॅ एक्झिक्युटिव्ह सदस्य यांच्या नेतृत्वात मंगळवारी हैदराबादकडे रवाना झाला आहे. 

विदर्भ क्रिकेट संघाचे कर्णधारपद पहिल्यांदा ग्रामीण भागातील विद्यार्थी व खेळाडूला मिळाल्यामुळे त्याच्या निवडीचे अनेकांनी कौतुक केले असून, विविध स्तरातून अभिनंदन करण्यात आले आहे. आदित्य हा महागाव येथील लोकमतचे तालुका प्रतिनिधी संजय भगत यांचा मुलगा असून आदित्यला लहानपणापासून स्केटिंग, हॉलीबॉल आणि क्रिकेटमध्ये विशेष आवड असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

Web Title: Aditya Bhagat, the leader of the Vidarbha team for the International Cricket Championship

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.