अभिजितच्या खुनाचे गूढ दुसºया दिवशीही कायमच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2017 10:35 PM2017-10-15T22:35:31+5:302017-10-15T22:35:53+5:30

येथील डेहणकर ले-आऊटमधील अभिजित टेकाम या शाळकरी विद्यार्थ्याच्या खुनाचे गूढ दुसºया दिवशीही कायम होते.

Abhijit's murder mystery is always on the second day | अभिजितच्या खुनाचे गूढ दुसºया दिवशीही कायमच

अभिजितच्या खुनाचे गूढ दुसºया दिवशीही कायमच

Next
ठळक मुद्देविविध पथकांकडून शोध : संशयितांची झाडाझडती सुरुच

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : येथील डेहणकर ले-आऊटमधील अभिजित टेकाम या शाळकरी विद्यार्थ्याच्या खुनाचे गूढ दुसºया दिवशीही कायम होते. पोलीस विविध पथकांकडून शोध घेत असून संशयिताची झाडाझडती सुरुआहे. नेमका खून कोणत्या कारणासाठी झाला, या निष्कर्षाप्रत अद्यापही पोलीस पोहोचले नाहीत. त्यामुळे सर्वच बाबींची पडताळणी पोलिसांकडून केली जात आहे.
ट्युशनसाठी गेल्यानंतर बेपत्ता झालेल्या अभिजित दीपक टेकाम (१३) या विद्यार्थ्याचा मृतदेह सुरजनगर परिसरातील झुडूपी जंगलात शनिवारी सकाळी पोलिसांच्या सर्चमध्ये सापडला. त्याचे डोके दगडाने ठेचून निर्घृण खून करण्यात आला होता. केंद्रीय विद्यालयाचा सहाव्या वर्गाचा विद्यार्थी असलेल्या अभिजितच्या खुनाने यवतमाळ शहरात खळबळ उडाली. प्रत्येक पालक हळहळ व्यक्त करीत आहे. दुसºया दिवशीही अभिजितच्या मारेकºयापर्यंत पोहोचण्यात पोलिसांना यश आले नव्हते. तसेच त्याच्या खुनामागील नेमक्या कारणांचे गूढही कायम आहे.
अभिजित हा शुक्रवारी सायंकाळी ४ वाजतापासून बेपत्ता झाला होता. त्याला शुक्रवारी ५ वाजताच्या सुमारास सुरजनगरमधील एका लॉन्ड्री समोरुन जाताना पाहिले होते. त्याचे एवढेच शेवटचे लोकेशन आतापर्यंत पोलिसांच्या हाती लागले आहे. अभिजितचा खून हा शुक्रवारी सायंकाळीच झाला. तो ओळखी असणाºयासोबतच झुडूपी जंगल परिसरात गेला असल्याचा पोलिसांचा कयास आहे. या जंगलाच्या अलिकडे त्याची सायकल मिळाली. त्यानंतर शनिवारी चार्ली पथकाच्या संपूर्ण टीमने येथे सामूहिक सर्च केला. तेव्हा अभिजितचा मृतदेह हाती लागला. मात्र शुक्रवारी रात्री या परिसरात जोरदार पाऊस झाल्याने घटनास्थळावर तपासासाठी आवश्यक असणारे नमुने गोळा करता आले नाही. इतकेच काय तर रक्ताने माखलेली माती किंवा दगडही येथे आढळला नाही. त्यामुळे तपासाची ही दिशा पोलिसांसाठी निष्प्रभ ठरली आहे. मात्र अल्पवयीनांमध्ये नशा करण्यासाठी वापरल्या जाणारे ‘डब्बे’ (सिन्थेटिक रबर सोलूशन) या ठिकाणी आढळून आले. याच एका धाग्यावर पोलिसांचा शोध सुरू असून सुरजनगर, आदिवासी सोसायटी, जामनकरनगर, डेहणकर ले-आऊट व भोसा परिसर येथे अशा प्रकारच्या नशा करणाºयांची झाडाझडती घेतली जात आहे. तर दुसरीकडे घटनास्थळावरून झालेल्या काही तांत्रिक बाबींचाही शोध पोलीस घेत आहेत.
क्राईमचा मॉडर्न प्रकार
अभिजितचा मृतदेह पोलिसांनीच शोधून काढला. त्यामुळे घटनास्थळाशी कुठलीही छेडछाड झाली नाही. मात्र पावसाने काही अडचणी निर्माण केल्या. या गुन्ह्यात मृतकाची पूर्ण ओळख असूनसुद्धा नेमका सुगावा मिळत नाही. हा गुन्हा क्राईमचा मॉडर्न प्रकार असून यात खºया अर्थाने पोलिसांचे कसब पणाला लागत आहे. प्रत्येक घटकांवर विचार करून त्याचा तपास केला जात असल्याचे एसडीपीओ पीयूष जगताप यांनी सांगितले. या तपासात मुलांमधील व्यसनाधीनतेचे वास्तवही पुढे आल्याचे सांगत. एकाच कुटुंबातील सख्खे भाऊ सोबत अशा प्रकारची नशा करीत असल्याचा प्रकार यातून पुढे आल्याचे जगताप यांनी सांगितले.

Web Title: Abhijit's murder mystery is always on the second day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.