यवतमाळात आयपीएल सट्ट्याची ५० कोटींची उतारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2019 11:33 PM2019-05-09T23:33:33+5:302019-05-09T23:33:56+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : विदर्भातील सर्वात मोठा आयपीएल सट्टा सध्या यवतमाळात सुरू आहे. थेट मुंबईच्या बुकींशी संबंध असल्याने ...

50 lakhs of IPL betting totals in Yavatmal | यवतमाळात आयपीएल सट्ट्याची ५० कोटींची उतारी

यवतमाळात आयपीएल सट्ट्याची ५० कोटींची उतारी

Next
ठळक मुद्देवरिष्ठांना पॅकेज : शहरालगतचे पॉश फार्म हाऊस बनले प्रमुख केंद्र

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : विदर्भातील सर्वात मोठा आयपीएल सट्टा सध्या यवतमाळात सुरू आहे. थेट मुंबईच्या बुकींशी संबंध असल्याने अनेक मटका व्यवसायिक यामध्ये गुंतले आहेत. दिवसाला ५० कोटींची उतारी येथे घेतली जात आहे. यंत्रणेतील वरिष्ठांना पॅकेज दिल्याने कुणीच कारवाईसाठी धजावत नाही.
स्थानिक गुन्हे शाखा, विशेष पथक, टोळी विरोधी पथकात अनेक धुरंदर व गुन्हेगारी विश्वातील खडान्खडा माहिती असलेले अधिकारी, कर्मचारी कार्यरत आहे. मात्र त्यांनी आखून दिलेल्या चौकटीतच काम करण्याचे आदेश आहे. यामुळे राजरोसपणे सुरू असलेल्या कोट्यवधीच्या उलाढालीकडे दुर्लक्ष केले जात आहे. या शाखा व पथकांमध्ये काहींनी केवळ वरिष्ठांचे हित कसे जोपासता येईल यासाठीच सेवा बजावली जात आहे. यामुळे नेटवर्क असूनही अनेक प्रामाणिक कर्मचारी-अधिकाऱ्यांची घुसमट होत आहे. आयपीएल सट्ट्यात अनेक युवक बरबाद झाले आहेत. काहींनी चक्क आत्महत्येचा मार्ग पत्करला आहे. याचे एवढे गंभीर परिणाम असूनही केवळ पॅकेज सिस्टीममुळे यंत्रणा बघ्याच्या भूमिकेत आहे.
शाखेतील एका नवख्या फौजदाराने दोन ठिकाणी धाड घालण्याचा प्रयत्न केला. त्याला ‘वेगळ््या’ पद्धतीची समज देऊन चूप बसविण्यात आले. यवतमाळ शहरालगतच्या तीन पॉश फार्म हाऊसवरून याचे आयपीएल सट्ट्याचे नियंत्रण सुरू आहे. नागपूर, गोदणी, पांढरकवडा, धामणगाव मार्गावर स्वंतत्र केंद्र आहेत. एका मटका व्यवसायिकाने खात्यातील वरिष्ठाकडे थेट सेटींग केल्याने तो आता कुणाचीही भिडमुर्वत ठेवत नसल्याचे सांगण्यात येत आहे.

Web Title: 50 lakhs of IPL betting totals in Yavatmal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.