Next

पंतप्रधान मोदींवरील बायोपिक प्रेरणादायी ठरेल - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2019 12:36 PM2019-01-08T12:36:30+5:302019-01-08T12:46:18+5:30

माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदींवर बायोपिक येत आहे. या चित्रपटाच्या पहिल्या पोस्टरचे नुकतेच ...

माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदींवर बायोपिक येत आहे. या चित्रपटाच्या पहिल्या पोस्टरचे नुकतेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. ‘पीएम नरेंद्र मोदी’ असे या चित्रपटाचे नाव असून या चित्रपटात अभिनेता विवेक ओबेरॉय हा प्रमुख भूमिकेत असणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींवरील बायोपिक प्रेरणादायी ठरेल असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.