Next

ड्रग्जच्या विळख्यात कसा अडकला भारत? Mumbai Drug Bust | Aryan Khan detained | India News

By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2021 09:47 AM2021-10-04T09:47:40+5:302021-10-04T09:47:58+5:30

नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) मुंबईतील एका प्रवासी क्रूझ जहाजावर छापा टाकत नारकोटिक्स पार्टीचा पर्दाफाश केला. अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानसह अनेकजणांना या प्रकरणात ताब्यात घेण्यात आलं आहे. मुंबईजवळच्या समुद्रात ही कारवाई सुरू असतानाच, तिकडे एलओसीजवळ उरी सेक्टरमध्ये 25 ते 30 किलो हेरॉईन आणि इतर ड्रग्ज पकडले आहेत. त्याची किंमत 30 कोटींपेक्षा जास्त असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे, ड्रग्जची नशा आणि त्याचा देशभरातील काळ्या धंद्याचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय... पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून, भारतातील ड्रग्जच्या व्यापाराची धक्कादायक आकडेवारी...