Next

जालन्याच्या फिक्स खासदार कोण, दानवे की खोतकर? तुम्हाला काय वाटतं ? Arjun Khotkar Vs Raosaheb Danve

By ऑनलाइन लोकमत | Published: January 5, 2022 05:24 PM2022-01-05T17:24:12+5:302022-01-05T17:24:30+5:30

फिक्स खासदार म्हणून 'या' नेत्याचे पोस्टर लागले अन् दानवेंचं टेन्शन वाढले. शिवसेनेचे नेते आणि माजी मंत्री असलेल्या अर्जुन खोतकर त्यांचं आणि भाजपचे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचं नातं म्हणजे विळी-भोपळ्यासारखं आहे.. जाहीर व्यासपीठावरून एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी ते सोडत नाहीत.. खरं तर 2019 च्या लोकसभा निवडणुकीत कोतकर यांनी रावसाहेब दानवे यांच्या विरोधात दंड थोपटले होते..खरे पण देवेंद्र फडणवीसांच्या मध्यस्थीनंतर त्यांनी माघार घेतली होती.. दरम्यान मधल्या काळात पुलाखालून बरेच पाणी वाहून गेलेय.. कधीकाळी मित्रपक्ष असलेली भाजप-सेना आता एकमेकांना पाण्यात बघत आहेत.. त्यानंतर अर्जुन खोतकर यांनी पुन्हा एकदा रावसाहेब दानवे यांच्या विरोधात दंड थोपटले आहेत.. खोतकर यांचा हा पवित्रा पाहून रावसाहेब दानवेचं टेंशन मात्र नक्की वाढलं असणार.. असं काय केलं नेमकं खोतकर यांनी पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून..