Israel Hamas War : इस्रायली लष्कराचा पॅलेस्टिनी नागरिकांना अल्टिमेटम, मोठ्या हल्ल्याची भीती

By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2024 03:13 PM2024-05-06T15:13:25+5:302024-05-06T15:13:53+5:30

Israel Hamas War: इस्रायलच्या लष्कराने सांगितले की, रफाहमधील रहिवाशांना मर्यादित निर्बंधांनुसार स्थलांतर करण्याचे आदेश देण्यास सुरुवात केली आहे.

Israel Hamas War: middle east israel begins evacuating part of rafah ahead of threatened assault | Israel Hamas War : इस्रायली लष्कराचा पॅलेस्टिनी नागरिकांना अल्टिमेटम, मोठ्या हल्ल्याची भीती

Israel Hamas War : इस्रायली लष्कराचा पॅलेस्टिनी नागरिकांना अल्टिमेटम, मोठ्या हल्ल्याची भीती

रफाह : गेल्या वर्षी सुरू झालेले इस्रायल-हमास युद्ध थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत. आता इस्रायलची नजर दक्षिण गाझा पट्टीतील इजिप्तच्या सीमेजवळ लागून असलेल्या रफाह शहरावर आहे. इस्रायल येथे कधीही हल्ला करू शकतो, याच पार्श्वभूमीवर इस्रायलच्या लष्कराने सोमवारी पॅलेस्टिनींना पूर्व रफाह रिकामे करण्याचे निर्देश दिले आहेत. दरम्यान, युद्धामुळे विस्थापित झालेल्या दहा लाखांहून अधिक पॅलेस्टिनींनी येथे आश्रय घेतला आहे.

अरबी संदेश, टेलिफोन कॉल्स आणि फ्लायर्सद्वारे, इस्रायलच्या लष्कराने पॅलेस्टिनींना 20 किमी (7 मैल) दूर असलेल्या विस्तारित मानवतावादी झोनमध्ये जाण्याची सूचना दिली आहे. तसेच, इस्रायलच्या लष्कराने सांगितले की, रफाहमधील रहिवाशांना मर्यादित निर्बंधांनुसार स्थलांतर करण्याचे आदेश देण्यास सुरुवात केली आहे.

इस्रायलने हमासविरुद्धच्या युद्धाला सात महिने उलटूनही रफाहमध्ये घुसखोरी करण्याची धमकी दिली आहे. इस्रायलच्या लष्कराचे म्हणणे आहे की, रफाहमध्ये हजारो हमास सैनिक आणि संभाव्य डझनभर ओलिस ठेवण्यात आले आहेत. रफाहला पराभूत केल्याशिवाय विजय अशक्य असल्याचे इस्रायलच्या लष्कराचे मत आहे.

रफाहमधील अनेक रहिवाशांनी सांगितले की, त्यांना त्यांची घरे रिकामी करण्यासाठी इस्रायलच्या लष्कराकडून फोन आले होते. त्याचवेळी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले की, रफाहवर रात्रभर केलेल्या हवाई हल्ल्यात इस्रायली विमानांनी १० घरांना लक्ष्य केले, त्यात २० लोक ठार झाले आणि अनेक जखमी झाले. रविवारी रफाहजवळील गाझामधील केरेम शालोम क्रॉसिंगवर हमासच्या रॉकेट हल्ल्यात तीन इस्रायली सैनिक ठार झाले, तर पॅलेस्टिनी आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले की, इस्रायली गोळीबारात किमान १९ लोक मारले गेले.

इस्रायल आणि हमासच्या युद्धाचा फटका संपूर्ण जगाला बसत आहे. इस्रायल आणि हमासच्या युद्धविराम चर्चेच्या नवीन फेरीत पाश्चात्य देश आणि शेजारी इजिप्त मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करत आहेत. दरम्यान, ओलिसांच्या सुटकेच्या कराराचा भाग म्हणून हमासने सर्वसमावेशक युद्धविरामाचा संकेत दिला असतानाच इस्रायल सैन्य माघार घेणार नाही, असे इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी रविवारी स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता हमास आणि इस्रायल यांच्यातील संघर्ष अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.

Web Title: Israel Hamas War: middle east israel begins evacuating part of rafah ahead of threatened assault

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.