Next

कोव्हिड सेंटरचं कंत्राट खरंच चहावाल्याला दिलं? Kirit Somaiya On ShivSena -Covid Test Centre Contract

By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2022 08:45 PM2022-02-13T20:45:58+5:302022-02-13T20:46:19+5:30

Kirit Somaiya... भाजपचे फायरब्रॅण्ड नेते... कागदपत्रांची जंत्री घेऊन आरोप करत, अनेकांना घाम फोडणारे नेते... नुसते आरोप नाही, तर महाराष्ट्रातील अनेक भागांत जाऊन थेट भिडणारे नेते... धनंजय मुंडे, अजित पवारांसह अनेक नेत्यांवर त्यांनी केलेल्या आरोपांमुळे मोठी खळबळ माजली... पण आता त्यांनी थेट ठाकरेंवर वार करत मोठा बॉम्बगोळा फोडलाय... तो बॉम्ब नेमका कोणता, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ शेवटपर्यंत नक्की पाहा... तर त्याचं झालंय असं की, महाविकास आघाडी सरकारने कोरोनाकाळात राज्यातील अनेक भागांमध्ये कोव्हिड सेंटर्सची उभारणी केली... त्यातून अनेक रुग्णांवर उपचारही झाले... पण हीच कोव्हिड सेंटर उभारताना शिवसेनेने म्हणजेच ठाकरेंनी त्यात मोठा घोटाळा केल्याचा आरोप किरीट सोमय्यांनी केलाय... महत्त्वाचं म्हणजे, एका चहावाल्याला ही कंत्राटं देऊन कोट्यवधींचा घोटाळा केल्याचाही आरोप त्यांनी केलाय... केईएम हॉस्पिटलच्या जवळ असलेल्या सह्याद्री रिफ्रेशमेंटच्या मालकाला म्हणजे, राजीव साळुंखे यांना ही कंत्राटं दिल्याचा खळबळजनक आरोप सोमय्यांनी केलाय... पाहूयात, सोमय्या काय म्हणालेत...