Next

कोल्हापुरात पोलिसांनी केला जल्लोष, २२ तास दिला खडा पहारा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2018 09:26 AM2018-09-24T09:26:00+5:302018-09-24T09:26:45+5:30

साऊंड  सिस्टिमला फाटा देत पारंपारिक वाद्यांच्या ठेक्यात यंदाच्या सार्वजनिक गणेश विसर्जन मिरवणुकीत प्रॅक्टिस क्लबच्या वादामुळे काही वेळ  मिरवणूक मार्गावर तणावसदृश परिस्थिती असताना अतिशय शांतपणे परिस्थिती हाताळत गणेश विसर्जन मिरवणूक शांततेत व उत्साही वातावरणात पार पाडली. 

कोल्हापूर : साऊंड  सिस्टिमला फाटा देत पारंपारिक वाद्यांच्या ठेक्यात यंदाच्या सार्वजनिक गणेश विसर्जन मिरवणुकीत प्रॅक्टिस क्लबच्या वादामुळे काही वेळ  मिरवणूक मार्गावर तणावसदृश परिस्थिती असताना अतिशय शांतपणे परिस्थिती हाताळत गणेश विसर्जन मिरवणूक शांततेत व उत्साही वातावरणात पार पाडली. मिरवणुकीची सांगता झाल्यानंतर पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्यासह पोलिसांनी गाण्यावर ठेका धरत जल्लोष केला.गणेश विसर्जन मिरवणूक शांततेत व उत्साही वातावरणात पार पाडल्याबद्दल कोल्हापूरकरांचे मी विशेष आभार मानतो. मिरवणुकीला कोणतेही गालबोट लागू नये हा मुख्य उद्देश पोलीस प्रशासनाचा होता. त्यामध्ये आम्ही सफल झालो. - डॉ. अभिनव देशमुख, पोलीस अधीक्षक